मराठी बातम्या /बातम्या /Viral /इथं तरुण, अविवाहितांसाठी मोफत घर; पण पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी

इथं तरुण, अविवाहितांसाठी मोफत घर; पण पूर्ण कराव्या लागतील 'या' अटी

इथे गर्लफ्रेंडप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची संधी; व्हायरल होतीय विचित्र जाहिरात

इथे गर्लफ्रेंडप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची संधी; व्हायरल होतीय विचित्र जाहिरात

रेडिट (Reddit) या सोशल मीडिया साइटवर एका घरमालकानं टू लेटची ही विचित्र जाहिरात दिली आहे. ही जाहिरात पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला. या पोस्टमध्ये त्या व्यक्तीनं स्पष्टपणे लिहिलं आहे, की 'मी एका सिंगल रूममेटच्या शोधात आहे. यासाठी संबंधित महिलेचं वय 18 ते 35 दरम्यान असावं. तसंच तिला लैंगिक संबंधातून होणारे कोणतेही संसर्गजन्य आजार नसावेत.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 04 ऑक्टोबर: आजपर्यंत तुम्ही विविध प्रकारच्या जाहिराती (Advertise) वाचल्या, पाहिल्या असतील. यात काही जाहिराती उत्पादन विक्रीच्या, तर काही खरेदीच्या असतात. लोकाचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनेक जण त्यांच्या जाहिराती मजेदार पद्धतीने तयार करतात. अशीच एक टू-लेटची (To-Let) जाहिरात सध्या सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल (Viral) होत आहे. एका व्यक्तीनं रूममेटच्या शोधार्थ ही जाहिरात दिली आहे. यात रूममेटसाठी जे निकष सांगण्यात आलेत, ते लोकांना फारच विचित्र वाटत आहेत. परंतु, त्या व्यक्तीने आपली गरज अगदी स्पष्टपणे नमूद केली आहे.

    रेडिट (Reddit) या सोशल मीडिया साइटवर एका घरमालकानं टू लेटची ही विचित्र जाहिरात दिली आहे. ही जाहिरात पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला. या पोस्टमध्ये त्या व्यक्तीनं स्पष्टपणे लिहिलं आहे, की 'मी एका सिंगल रूममेटच्या शोधात आहे. यासाठी संबंधित महिलेचं वय 18 ते 35 दरम्यान असावं. तसंच तिला लैंगिक संबंधातून होणारे कोणतेही संसर्गजन्य आजार नसावेत. तसंच ती आपल्या एक्स बॉयफ्रेंडच्या संपर्कात नसावी. अशी कोण महिला असेल तर ती निःशुल्क रूममेट बनू शकते.'

    त्या व्यक्तीनं त्याच्या गरजा पूर्ण करणारी रूममेट (Room mate) हवी असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. ही महिला (Women) सिंगल म्हणजेच अविवाहित (Unmarried) असावी आणि ती कोणत्याही रिलेशनशिपशिवाय आपल्यासोबत राहण्यास तयार असावी, असं त्या व्यक्तीनं स्पष्ट केलं आहे. या काळात दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण होऊ शकतात. परंतु, त्यात प्रेमाचा ट्विस्ट नसावा, असं त्या व्यक्तीचं म्हणणं आहे. रूममेटकडून घरभाडं (House Rent) म्हणून ही व्यक्ती एक रुपयादेखील घेणार नाही. रूममेटला घराची स्वतंत्र चावी देण्यात येईल आणि गरज पडल्यास त्या व्यक्तीच्या कारचा वापरही रूममेटला करता येणार आहे.

    जाहिरातीत काय म्हटलं आहे?

    या जाहिरातीत म्हटलं आहे, की 'तुम्ही तरुण आणि अविवाहित स्त्री असाल. तुमचं वय 18 ते 35 वर्षांदरम्यान असेल, राहण्यासाठी तुम्ही सुंदर जागेच्या शोधात असाल किंवा गर्लफ्रेंडप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची तुमची तयारी असेल, तर ही पोस्ट फक्त तुमच्यासाठीच आहे.'

    हे वाचा - छोट्या छोट्या सवयींमुळे येतंय म्हातारपण; पाहा तुम्हीसुद्धा करत नाहीत ना अशी चूक

    'मी एक स्वतंत्र आणि अविवाहित व्यक्ती आहे. मला नाटकी न वागणाऱ्या आणि माझ्यासोबत राहू शकणाऱ्या महिलेचा सहवास हवा आहे. मला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मी सिगारेट किंवा दारू पीत नाही. आपण एकमेकांना पसंत पडलो, तर तुम्ही माझ्या घरात नि:शुल्क राहू शकता आणि बचत करू शकता.'

    'राहण्याच्या दृष्टीनं माझं घर एकदम सुरक्षित आहे. सोबतच तुम्हाला घराची वेगळी चावीदेखील दिली जाईल. त्यामुळे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घरात राहू शकाल. याशिवाय माझी नवी कोरी गाडीही तुम्हाला वापरता येईल; मात्र संबंधित तरुणी सिगारेट किंवा दारू पिणारी नसावी. तसंच तिला कोणताही लैंगिक आजार (Sexual Disease) नसावा. ती तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या आठवणीनं व्याकूळ होणारी नसावी. या सर्व अटी मान्य असतील, तर संबंधित तरुणीनं आपल्या छायाचित्रासह अर्ज करावा,' असं या अनोख्या जाहिरातीत नमूद करण्यात आलं आहे.

    कमेंट्सचा वर्षाव

    टू लेटच्या या जाहिरातीवर अनेकांनी कमेंट (Comment) केल्या आहेत. ज्या मुली अर्थिक अडचणीत आहेत, त्यांच्यासाठी ही शानदार ऑफर असल्याचं एका मुलीनं कमेंटमध्ये म्हटलं आहे. तर, ही जाहिरात म्हणजे घर भाडेतत्त्वावर देण्यासाठीची माहिती कमी आणि वेश्या व्यवसायाचा प्रचार अधिक वाटतो, असे एका व्यक्तीनं कमेंटमध्ये म्हटले आहे.

    हे वाचा - काय म्हणावं याला! चक्क प्रेशर कुकरसोबतच केलं लग्न; 4 दिवसांतच घटस्फोट

    अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या असून, ही पोस्ट व्हायरल झाली आहे. एवढं करून त्या व्यक्तीला रूममेट मिळाली की नाही, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

    First published:

    Tags: Advertisement, Home Loan, Lifestyle