Home /News /lifestyle /

Health Tips: छोट्या छोट्या सवयींमुळे येतंय म्हातारपण; पाहा तुम्हीसुद्धा करत नाहीत ना अशी चूक

Health Tips: छोट्या छोट्या सवयींमुळे येतंय म्हातारपण; पाहा तुम्हीसुद्धा करत नाहीत ना अशी चूक

आपण आपल्या दिनक्रमातल्या काही सवयी बदलल्या तर वय वाढत असूनही त्वचेची (Skin) चमक, निरोगीपणा, मुलायमपणा कायम ठेवता येतो. तर, जाणून घेऊया आपल्याला कोणत्या सवयी बदलाव्या लागतील.

    नवी दिल्ली, 03 ऑक्टोबर: हे खरं आहे की, सौंदर्य वयावर अवलंबून नसतं. प्रत्येकजण कोणत्याही वयात सुंदर दिसू शकतो. पण तुम्ही तुमच्या नाजूक त्वचेची काळजी घेतली नाही, तर ती लहान वयातच वृद्धत्व दाखवू लागते. अशा परिस्थितीत आपण आपल्या जीवनशैलीतल्या काही सवयी बदलल्या तर आपल्या त्वचेला (Skin Care) अधिक तरुण आणि तजेलदार ठेवता (Habits That May Contribute to Premature Skin Aging ) येतं. एव्हरीडे हेल्थनुसार, जर आपण आपल्या दिनक्रमातल्या काही सवयी बदलल्या तर वय वाढत असूनही त्वचेची (Skin) चमक, निरोगीपणा, मुलायमपणा कायम ठेवता येतो. तर, जाणून घेऊया आपल्याला कोणत्या सवयी बदलाव्या लागतील, जेणेकरून आपली त्वचा अकाली वृद्धत्वापासून सुरक्षित राहील. या सवयींमुळं निर्माण होते अकाली वृद्धत्वाची समस्या 1. वारंवार डोळे चोळणं डोळ्यांभोवतीची त्वचा अतिशय नाजूक असते. ती वारंवार चोळल्यामुळं डोळ्यांभोवतीच्या त्वचेला आणि सभोवतालच्या स्नायूंना हानी पोहोचू शकते. त्यामुळं या त्वचेवर बारीक रेषा/सुरकुत्या येऊ शकतात. कधीकधी त्वचेवर कायमचे दुष्परिणामही होऊ शकतात. 2. रात्री कमी झोप तुम्ही रात्री कमी झोपत असाल तर तुमच्या त्वचेचं आरोग्य बिघडू शकतं. संशोधनानुसार, रात्री सर्वात जास्त प्रमाणात त्वचा स्वतःतील समस्या दुरुस्त करून आरोग्य मिळवत असते. त्यामुळं 7 ते 8 तासांची पूर्ण झोप घेतली नाही तर हळूहळू त्वचेतील लवचिकता गमावू लागते आणि बारीक रेषा किंवा सुरकुत्या येऊ लागतात. 3. पिण्यासाठी स्ट्रॉचा वापर तुम्ही फक्त कोणतंही पेय पिण्यासाठी वारंवार स्ट्रॉचा वापरत असाल तर यामुळं तोंडाभोवती बारीक रेषा तयार होऊ शकतात. तेव्हा शक्य तितकी पेये स्ट्रॉशिवाय पिणं चांगलं. 4. वारंवार तणाव जेव्हा तुम्ही बराच काळ तणावाखाली असता, तेव्हा तुमचं शरीर सतत असे काही हार्मोन्स सोडतं, जे वृद्धत्व आणि अकाली त्वचेची समस्या वाढवतात. हे वाचा - Railway Jobs : रेल्वेमध्ये 10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीच्या संधी; या तारखेपर्यंत करा अर्ज 5. मेकअप स्वच्छ न करणं रात्री झोपण्यापूर्वी त्वचेवरील मेकअप पूर्णपणे काढून टाकला नाही तर, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू त्वचेची लवचिकता संपते. यामुळं त्वचेवर सुरकुत्या किंवा रेषा अधिक वेगानं येऊ लागतात. 6. अतिनील किरणांमुळं होणारं नुकसान तुम्ही दररोज यूव्ही प्रोटेक्टर वापरत नसाल तर, ते तुमच्या त्वचेसाठी खूप हानिकारक असू शकतं. बरेच लोक सनस्क्रीन किंवा सन लोशन वापरतात. पण मान आणि हातांना मात्र ते लावत नाहीत. असं करू नये. हे वाचा - अखेर समंथा आणि नागा चैतन्यने घेतला घटस्फोटचा निर्णय! अभिनेत्रीने शेअर केली इमोशनल पोस्ट 7. सनग्लासेस घालू नये उन्हात सनग्लासेस न वापरल्यास डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेचं खूप नुकसान होतं. ही त्वचा अतिशय नाजूक असते आणि हानिकारक अतिनील किरणांमुळं ती खराब होऊ शकते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Skin, Skin care

    पुढील बातम्या