जकार्ता, 02 ऑक्टोबर : प्रेम आंधळं असतात असं म्हणतात. प्रेम कधी, कुठे आणि कोणावर होईल आणि त्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. असंच एक उदाहरण पाहायला मिळालं ते इंडोनेशियात (Indonesia). जिथं एक व्यक्ती चक्क प्रेशर कुकरच्याच प्रेमात पडला. इतकंच नव्हे तर त्याने कुकरसोबत लग्न करून (Man marries pressure cooker) संसारही थाटला आणि लग्नानंतर चार दिवसांतच कुकरसोबत घटस्फोटही घेतला (Man divorce pressure cooker) . या विचित्र लग्नाची (Weird Marraige) चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) आहे.
इंडोनेशियात राहणारा खोइरुल अनामने (Khoirul Anam) सोशल मीडियावर आपल्या लग्नाने जबरदस्त खळबळ माजवली आहे. कारण त्याने माणूस नाही तर चक्क एका प्रेशर कुकरसोबत लग्न केलं आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral photo) होत आहेत.
खोइरुलने कुकरसोबत आपले काही आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. ज्यात तो एका पांढऱ्या कुकरसोबत दिसतो आहे. हा पांढरा कुकर आपली बायको असल्याचं त्याने सांगितलं आहे.
हे वाचा - सोशल मीडियावरचा 1 नंबर ट्रेण्ड झाली ही आईस्क्रीम इडली! तुमचं काय म्हणणं आहे यावर
बरं हे फक्त बोलण्यापुरतं नाही. तर त्याने कुकरसोबत कायदेशीररित्या लग्न केलं. लग्नाच्या पेपर्सवर सही केली आणि कुकरला आपली बायको बनवलं. पांढऱ्या कुकरसोबत काही पोझ दिल्या आहेत. एका फोटोत तर त्याला किस करतानाही दिसतो. माझी नवरी सुंदर आहे, माझं सर्वकाही ऐकतं, काहीच बोलत नाही आणि जेवणही बनवते, म्हणून त्याने कुकरसोबत लग्न केल्याचं सांगितलं.
खोइरुलच्या या लग्नाचे फोटो पाहूनच सर्वांना धक्का बसला आहे. पण त्यानंतर तर त्याने आणखी मोठा धक्का दिला. कुकरसोबत लग्न करून 4 दिवसांतच त्याने त्याच्यासोबच घटस्फोटही घेतला (Man Divorce Pressure Cooker). याचं कारणही त्याने विचित्र दिलं आहे. त्याने लग्नाप्रमाणेच घटस्फोटाची घोषणाही सर्वांसमोर केली. आपल्या बायकोला फक्त भात शिजवता येतो, दुसरं काहीच नाही असं तो म्हणाला आणि घटस्फोट दिला.
हे वाचा - बापरे! 2 महिने बाटलीत अडकला त्याचा प्रायव्हेट पार्ट; डॉक्टरांनी कापूनच टाकला
खोइरुल इंडोनेशियातील फेमस कंटेन्ट क्रिएटर आहे. फेसबुकवर त्याचं वेरिफाइड प्रोफाइल आहे. त्याची ही पोस्ट तुफान व्हायरल होते आहे आणि त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Divorce, Indonesia, Lifestyle, Love, Marriage, World news