नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : जंगलाचा राजा सिंह किती खतरनाक असतो आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्याला अगदी दुरून पाहिलं तरी घाम फुटतो. त्याच्यासमोर जाण्याची हिंमत होत नाही. माणसंच नाही तर प्राणीही त्याच्यासमोर जायला घाबरतात. पण एका व्यक्तीने ती हिंमत केली. फक्त सिंहाच्या जवळच तो गेला नाही तर सिंहाशी त्याने पंगाही घेतला आणि ते त्याला चांगलंच महागात पडलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
पिंजऱ्यात आहे म्हणून त्याने सिंहाशी थट्टा करण्याचा प्रयत्न केला. पण ते त्याच्यावरच उलटलं आहे. आपण जंगलाचा राजा आहोत, हेच या सिंहाने दाखवून दिलं आहे. धक्कादायक पण मजेशीर असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओत पाहू शकता सिंह पिंजऱ्याच्या आता आणि ती व्यक्ती त्या पिंजऱ्याच्या बाहेर. सिंह तसा शांत दिसतो आहे पण ही वादळापूर्वीची शांतता आहे बरं का... कारण पुढे जे घडतं ते धक्कदायक आहे.
सिंहासमोर उभी असलेली ही व्यक्ती सुरुवातीला आपला हात सिंहाच्या पिंजऱ्यात टाकते. तेव्हा सिंह डरकाळी फोडतो आणि ती व्यक्ती भीतीने आपला हात मागे घेते. यावेळी आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. सुदैवाने तरुण बचावतो म्हणून आपल्याही जीवात जीव येतो. पण ही व्यक्ती पुन्हा तीच चूक करते.
ती आपला हात पिंजऱ्यात टाकते आणि यावेळी मात्र सिंहसुद्धा आणखी चवताळतो आणि त्या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यात धरतो. ती व्यक्ती आपला हात सिंहाच्या जबड्यातून खेचण्याचा प्रयत्न करते. आपल्या दुसऱ्या हाताने तो सिंहाच्या डोक्यावरही मारतो जेणेकरून तो तोंड उघडेल. पण सिंह अधिकच आक्रमक होतो आणि त्याचा हात आणखी घट्ट धरतो.
सिंह काही त्या व्यक्तीचा हात आपल्या जबड्यातून सोडायला तयार नाही. या व्यक्तीने सिंहाशी पंगा घेतला आणि सिंहाने त्याला चांगलीच अद्दल घडवली. या व्यक्तीला आपण आयुष्यात केलेली ही सर्वात मोठी चूक असावी असंच वाटलं असावं. तो जिवाच्या आकांताने ओरडतो आहे, मदत मागतो आहे. त्याच्या आजूबाजूला लोक आहेत, पण भीतीने कुणीच पुढे यायला बघत नाही. दूरूनच लोक सिंहाला दगड मारून त्या व्यक्तीची मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सिंह काही त्या व्यक्तीचा हात सोडत नाही.
हे वाचा - Baby Elephant मालकावर झोपला आणि... हा Video जितका क्यूट तितकाच धोकादायक
हुश्श... कसंबसं करून ती व्यक्ती स्वतःच सिंहाच्या तावडीतून आपली सुटका करून घेते. यापुढे ती सिंहाच्या पिंजऱ्यात हात टाकण्याची काय पिंजऱ्यासमोर उभं राहण्याचीही हिंमत कधीच करणार नाही.
शेर ने दबोच लिया शख्स का हाथ#ViralVideo pic.twitter.com/ih86qoYmr1
— Nandan singh (@Singh17Nandan) November 15, 2022
हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे माहिती नाही. @Singh17Nandan ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral, Viral videos, Wild animal