मुंबई १५ नोव्हेंबर : सोशल मीडिया वर आपल्या समोर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात. जे पाहाताना खूपच मनोरंजक वाटतात. लोक येथे आपल्या आवडी प्रमाणे व्हिडीओ पाहाता. यामध्ये कॉमेडी, सायन्स, क्राफ्ट, जेवण, ट्रॅवल्स असे अनेक अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. शिवाय येथे वाईल्ड लाईफ संदर्भात देखील व्हिडीओ असतात. त्यामुळे प्राणी प्रेमींसाठी देखील वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ हा हत्तीशी सबंधीत आहे. या व्हिडीओमध्ये एक क्यूट हत्ती त्याच्या मालकासोबत खेळत आहे. पण असं करत असताना त्याचं हे प्रेम त्याच्या मालकाच्या जीवावर उठतं. हे ही पाहा : Viral Video : नाकाखालून पळालं शिकार आणि वाघ फक्त पाहातच राहिला… हत्ती हे सर्वात प्रेमळ प्राणी आहेत. ते अवाढव्य आहेत, परंतु ते गोड आणि प्रेमळ देखील आहे. त्यांना प्रेमाची जाणीव आहे. त्यांनी जर का एखाद्याला लळा लावला, तर मग ते त्या व्यक्तीसाठी वाटेल ते करण्याची देखील तयारी दाखवतात. याशिवाय हत्तींबद्दल बोलायचे झाले तर त्यांना मजा करायला आणि मनसोक्त जगायला आवडते. असंच काहीसं या व्हिडीओमधील हत्ती करताना दिसता. हा व्हिडीओमधील हत्ती लहान आहे. त्याला आपण बेबी एलिफन्ट देखील बोलू शकतो. हा लहान हत्ती त्याच्या मालकासोबत खेळत आहे. त्याचा मालक खाली झोपला आहे आणि हा लहान हत्ती मजा म्हणून त्याच्यावर झोपत आहे आणि त्याला मीठी मारण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं पाहाताना आपल्याला खूपच क्यूट वाटत आहे. परंतु हे सगळं करत असताना या छोट्या हत्तीने त्याच्या मालकाला जवळ-जवळ चिरडले आहे. हत्ती लहान असला तरी देखील त्याचं वजन नक्कीच जास्त आहे. त्यामुळे त्याचा संपूर्ण जोर त्याच्या खाली असलेल्या मालकावर पडला आहे.
असं असलं तरी देखील ही गोष्ट हत्तीच्या लक्षात येत नव्हती. हा हत्ती आपला प्रेमाने आपल्या मालकाला कुरवाळत होता. अखेर त्याच्या मालकाने जोर लावून या छोट्या हत्तील बाजूला ढकललं आणि आपली सुटका करुन घेतली. पण असं असलं तरी देखील तो हत्ती पुन्हा प्रेमाने आपल्या मालकाजवळ जात होता. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ’naturre’ पेजद्वारे पोस्ट केला गेला होता आणि मूळतः ‘andy_malc’ वापरकर्त्याने पोस्ट केला होता: “हॅपी टाइम, तुम्हाला या हत्तीसोबत खेळायला आवडेल का?” असं कॅप्शन देखील या पोस्टला दिलं आहे.
या व्हिडीओला खूपच जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना हा व्हिडीओ क्यूट वाटतोय, पण यामध्ये या व्यक्तीची जी अवस्था झाली, ती पाहून मात्र लोकांना मालकाबद्दल थोडं वाईट देखील वाटतंय.