मराठी बातम्या /बातम्या /Viral /खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीनं केलं असं काम, अखेर अधिकाऱ्यांना रातोरात बांधावा लागला रस्ता

खड्ड्यात पडलेल्या व्यक्तीनं केलं असं काम, अखेर अधिकाऱ्यांना रातोरात बांधावा लागला रस्ता

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

त्याने असं काय केलं असावं, असा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल... मग हा व्हिडीओ पाहा

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बंगळुरू 14 नोव्हेबर : बंगळुरूच्या ट्राफिकबद्दल काही वेगळं सांगायला नको. मुंबईपेक्षा ही बंगळुरुमधील ट्राफीक जास्त आहे. जे देशभर चर्चेत आहे. परंतु आता बंगळूचे खड्डे देखील चर्चेत आले आहे. खड्डे हे ट्राफीक मागील एक कारण आहे. पण या सगळ्यात खड्डे चर्चेत आलेत. ते एका व्यक्तीमुळे.

खरंतर खड्यात पडल्यामुळे या व्यक्तीने असं काही केलं, ज्यामुळे तेथील सरकारला याची दखल घेऊन रातोरात रस्ता बांधावा लागला.

आता तुमच्या मनात देखील असंच आलं असणार की, या व्यक्तीने नक्की असं काय केलं असावं आणि नक्की तेथे असं काय घडलं? चला जाणून घेऊ या.

हे ही पाहा : फक्त 'या' एका गोष्टीची भीती वाटते... चिमुकल्याचं उत्तर ऐकून डोक्याला हात लावाल

शुक्रवारी रस्त्यावर खड्डे पडल्याने एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला. ट्विटर हँडल- स्पीक अप बेंगळुरूने या व्यक्तीची कहाणी शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक व्हिडीओ आहे आणि त्यावर लिहिले आहे की, आज (शुक्रवार) सकाळी 6 वाजता ही व्यक्ती गाडी चालवत असताना खड्ड्यात पडली. याबाबत अद्याप कोणत्याही अधिकारी किंवा प्रतिनिधीकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आदर्श थिएटर, ओल्ड मद्रास रोड, बंगलोर. सीव्ही रमण नगरचे आमदार @mla_raghu यांचे आभार ज्यांनी येथील लोकांना दररोज जीव मुठीत धरून लढण्यास भाग पाडले.

व्हिडीओमध्ये, हा माणूस अपघातानंतर रस्त्यावर धरणे आंदोलन करुन बसला आहे. हा तरुण त्याची गाडी बाजूला लावून रस्त्याच्या मधओमध बसला आहे. त्याला येणारे जाणारे लोक पाहात आहेत. परंतु तो काही तेथून उठला नाही. उलट तो नागरी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून प्रतिक्रिया मागत आहे. या आंदोलनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने हा खड्डा भरण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

खड्ड्यांवर दाखवला राग?

कर्नाटक सरकारचा निषेध करताना लोक म्हणाले की, बेंगळुरू प्राधिकरण खड्ड्यांचे प्रश्न तीनच प्रकारे सोडवले जातात १) पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा शहराला भेट देतात. 2) खड्ड्यांमुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास आणि 3) एखाद्या जखमी व्यक्तीने खड्ड्यांच्या ठिकाणी विरोध केल्यावर.

लोकांनी मजेदार पद्धतीने प्रशासनाची खेचली आहे. पण काहीही असलं करी देखील हा खड्डा भरुन निघाला हे महत्वाचं.

First published:

Tags: Shocking, Top trending, Videos viral, Viral