मुंबई १३ नोव्हेंबर : लहान मुलं फारच निरागस असतात. ते चांगलं वाईट असा काहीच विचार करत नाहीत. त्यांच्या मनात जे येतं ते सगळं बोलून ते मोकळे होतात. आताची लहान मुलं तर इतकी हुशार आहेत की बोलण्यात आणि वागण्यात त्यांचा हात कोणीच धरु शकत नाही. स्मार्टफोन आणि सोशल मीडिया यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडते, पण आज आम्ही तुमच्यासाठी एक असा व्हिडीओ घेऊन आलो आहोत. तो पाहून तुमच्या लक्षात येईल की हा चिमुकला किती हुशार आहे ते. सोशल मीडिया वर एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे आणि या व्हिडीओमध्ये हा चिमुकला डायलॉगबाजी करत आहे. हे ही पाहा : शाळकरी मुलाच्या ‘चंद्रा’नं अख्ख्या महाराष्ट्राला लावलंय वेड, सूर असा की अंगावर येतील शहारे, पाहा Video हा मुलगा इतका लहान आहे, पण त्याची डायलॉगबाजी ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक चिमुकला शाळेच्या कपड्यांमध्ये आहे. सुरुवातीला त्याची शाळा कोणती हे विचारण्यात आले, तेव्हा तो एखाद्या मशीन प्रमाणे सुरु होतो आणि आपल्या शाळेच्या नावासह, त्याचा पत्ता देखील सांगतो. त्यानंतर त्याचं नाव विचारण्यात येतं, तेव्हा तो चक्क इंग्रजीत उत्तर देतो आणि म्हणतो, ‘‘माय नेम इज विवेक कुमार’’. इथ पर्यंत सगळं ठिक आहे, पण जेव्हा त्याला एक डायलॉग ऐकव असं विचारण्यात येतं तेव्ह, मात्र तो हद्दच करतो. हा चिमुकला विवेक कुमार म्हणतो, “ना गोळीला ना तलवारला, हा व्यक्ती घाबरतो तो फक्त आपल्या वडिलांच्या माराला….” तो ज्या पद्धतीने हा डायलॉग मारतो ना त्याचे एक्स्प्रेशन खूपच भारी आहेत.
डायलॉग मारणं तर सगळ्यांना येतं, पण या चिमुकल्याने ज्या पद्धतीने तो मारला आहे, हे ऐकून तुम्ही देखील डोक्याला हात लावाल आणि हे नक्की म्हणाल, काय ही आत्ताची मुलं… हे ही पाहा : ‘‘आमच्या वेळेला कुठे होते असे शिक्षक?’’ हा क्यूट VIDEO पाहून तुम्हीही असंच म्हणाल या मुलाचा हा व्हिडीओ युट्यूबर अपलोड करण्यात आला आहे. जो खूपच क्यूट आहे. नोटकऱ्यांना हा व्हिडीओ फारच आवडला आहे.