व्हिडीओत पाहू शकता हत्ती आणि तरुण सी-सॉवर समोरासमोर आले. तरुणाच्या हातात एक बॉलही आहे. आता त्यांच्या खेळाचा उद्देश म्हणजे फक्त सी-सॉ करणं नव्हे तर सी-सॉ करत बास्केटबॉल खेळणंही आहे. हे वाचा - चवताळलेल्या हत्तीने सोंडेने हवेत उडवली कार; पाहा गजराजाच्या रूद्र अवताराचा VIDEO म्हणजे हत्तीने सी-सॉवरी पाय उचलताच तरुण हवेत उडतो आणि दुसऱ्या दिशेला जात बास्केटमध्ये बॉल टाकतो. या तरुणानंतर दुसरा तरुणही तसं करण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या मित्राप्रमाणे हवेत उडणं दूर उलट सी-सॉच तुटतं. हा एक मजेशीर व्हिडीओ आहे. व्हिडीओ नीट पाहिला तर तुम्हाला दिसेल की पहिल्या तरुणाची बॉडी परफेक्ट आहे. पण दुसरा तरुण मात्र थोडा लठ्ठ आहे. त्यामुळे पहिल्या तरुणाला हत्ती अगदी अलगद उडवतो पण दुसऱ्या तरुणाला उडवणं हत्तीलाही शक्य होत नाही. तो तरुण उडण्याऐवजी हत्तीच्या पायाजवळी सी-सॉचा भागच तुटतो. हे वाचा - पाकिस्तानचा जुगाड, Video बघून तुम्हालाही आवरता येणार नाही हसू shadokht__mazari_ इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फनी व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Elephant, Viral, Viral videos