मराठी बातम्या /बातम्या /Viral /

खतरनाक! चवताळलेल्या हत्तीने सोंडेने हवेत उडवली कार; पाहा गजराजाच्या रूद्र अवताराचा VIDEO

खतरनाक! चवताळलेल्या हत्तीने सोंडेने हवेत उडवली कार; पाहा गजराजाच्या रूद्र अवताराचा VIDEO

संतप्त हत्तीने कारवर केला हल्ला.

संतप्त हत्तीने कारवर केला हल्ला.

संतप्त हत्तीने कारवर केला हल्ला.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 14 ऑक्टोबर : हत्ती (Elephant video) लहान असो वा मोठा तो आपल्याला क्युटच वाटतो. शक्यतो हत्ती कितीही अवाढव्य असला तरी सहसा तो विना कारण माणसांवर हल्ला करत नाही. बहुतेक वेळा तो शांतच असतो. पण आपल्याला धोका आहे असं वाटलं तर हाच शांत हत्ती भडकतो (Angry elephant video) आणि त्यानंतर मात्र त्याला आवरणं कठीण नाही अशक्यत असतं. अशाच एका चवताळलेल्या हत्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात त्याने चक्क एका कारवर हल्ला केला आहे (Angry elephant attack on car).

एका संतप्त हत्तीने कार आपल्या सोंडेने हवेत उडवली आहे. आलिशारन कारची अक्षरशः या हत्तीने अक्षरशः वाट लावली आहे. एरवी शांत दिसणाऱ्या या गजराजाने आपला रूद्र अवतार धारण केला आणि मग जे घडलं की धडकी भरवणारं आहे. व्हिडीओ पाहूनच तुमच्या हृदयाची धडधड वाटेल. एखादा फुटबॉल किंवा छोटंसं खेळणं असावं तशी तो कार उडवतो.

व्हिडीओत पाहू शकता एका ठिकाणी कार उभी आहे. कार पाहून हत्ती संतप्त होतो आणि तो त्या कारजवळ जाऊन सोंडेत धरून उडवताना दिसतो. त्यानंतर कारच्या समोर येतो आणि सोंडेने ती कार मागे ढकलतो.

हे वाचा - नको ती डेअरिंग भलतीच महागात पडली! धावत येत हत्तीने बाईकस्वारांना पाडलं आणि....; भयंकर घटनेचा VIDEO

कार हटवण्याचा प्रयत्न करतो आहे, असंच या व्हिडीओतून स्पष्ट होतं. कार जशी थोडी मागे सरकते, तेव्हा हत्तीचा राग शांत होतो आणि तो मागे फिरतो.

हा हत्ती एकटा नाही तर त्याच्यासोबत बरेच हत्ती आहेत, असंही या व्हिडीओत दिसतं. मानवी वस्तीत शिरून या हत्तींनी धुमाकूळ घातल्याचंही दिसतं आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे माहिती नाही. पण ह हेलिकॉप्टर यात्रा नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्स शॉक झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

हे वाचा - मासे पकडत होता चिमुकला; मगरीने जबड्यात धरला गळ आणि...; अंगावर काटा आणणारा VIDEO

काही दिवसांपूर्वीच अशाच एका संतप्त हत्तीने एका बसवर हल्ला केला होता. भारतीय वन सेवा अधिकारी (IFS) सुप्रिया साहू यांनी नीलगिरी येथील हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला होता.

हत्तीनं जोरजोरात हल्ला करत बसची काच फोडूनही चालकानं संयमानं परिस्थिती हाताळली. अतिशय समजदारीनं चवताळलेल्या हत्तीला शांत केलं आणि प्रवाशांना सुरक्षित ठेवलं.

First published:

Tags: Elephant, Shocking viral video, Viral, Viral videos, Wild animal