नवी दिल्ली 15 मार्च : माणसासोबतच जंगलात राहाणाऱ्या प्राण्यांमध्येही (Wild Animals) भावना असतात. फक्त माणसूच एकमेकांच्या मदतीला धावून येतो असं नाही. तर आपल्या गटातील एखादा प्राणी अडचणीत असेल तर प्राणीदेखील त्याच्या मदतीसाठी काहीही विचार न करता धावून येतात. इतकंच नाही तर एखादा प्राणी अतिशय मोठ्या संकटात सापडला तर ते स्वतःचा जीव धोक्यात घालूनही आपल्या साथीदाराला वाचवण्याचा प्रयत्न करतात. उडता उडता एका पक्ष्याचा दुसऱ्या पक्ष्यावर हल्ला; आकाशातील शिकारीचा थरारक VIDEO सोशल मीडियावर याचा प्रत्यय देणारे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. ज्यात सिंहाने एखाद्या प्राण्यावर हल्ला केला तर जंगली प्राणी आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी एकत्र येतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे (Shocking Video of Lion Attack). यात सिंहाची शिकार करणाऱ्या लोकांवर दुसरा सिंह हल्ला करताना दिसतो. हा थरारक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधत आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की दोन शिकारी सिंहाची शिकार केल्यानंतर त्याच्या शेजारीच बसलेले असतात. यातील एक शिकारी उठून काहीतरी काम करू लागतो. तर दुसरा शिकारी आपल्या आजूबाजूला लक्ष न देता, शिकार केलेल्या सिंहाचं निरीक्षण करू लागतो. इतक्यात आपल्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असलेला एक दुसरा सिंह धावत तिथे येतो. हे पाहून दोन्ही शिकारी तिथून धूम ठोकतात.
बापरे! का कोण आहे? गवतासारखा दिसणारा विचित्र जीव; VIDEO पाहून सर्वजण हैराण
सोशल मीडियार हा थरकाप उडवणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि नेटकऱ्यांच्या पसंतीसही उतरत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक यूजर्सनी यावर कमेंटही केल्या आहेत. अनेकांनी म्हटलं की कर्माचं फळ मिळणारच. बातमी देईपर्यंत 1 लाखहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर 10 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईकही केला आहे. हा आकडा वाढतच आहे.