मुंबई, 22 मे : ते म्हणतात ना, ‘‘शौक बडी चिज होती है जनाब.’’ तसंच काहीसं एका व्यक्तीनं केलं, पण त्याचे गंभीर परिणाम त्याला भोगावे लागले. लागतील याचा त्याने विचार देखील केला नसावा. खरंतर या व्यक्तीला जंगली प्राणी पाळण्याची इच्छा होती आणि त्यानं तसं केलं देखील पण त्याचा परिणाम इतका भयंकर झाला की त्यामध्ये त्याने आपले प्राण गमावली. ज्या प्राण्यांपासून माणसांनी शक्यतो दूर राहण्याची गरज असते, अशा प्राण्यांना अनेक लोक पाळतात किंवा आपल्यासोबत ठेवतात. तसंच या व्यक्तीनं केलं. पण त्याच्यासोबत जे घडलं ते धक्कादायक आहे. या व्यक्तीची कहाणी इतकी भयंकर आहे की त्याबद्दल ऐकून तुमच्या अंगावर शहारा येईल. तरुणींना हॉटेल रुममध्ये दिसली धक्कादायक गोष्ट, पाहून सरकली पायाखालची जमीन अलीकडेच, जोसेफ बी नावाच्या व्यक्तीचा मृतदेह सापडला. त्याच्या मृत्यूची पुष्टी त्याच्या काही हाडांनी केली गेली आहे. त्याच्याच पाळीव प्राण्यांनी त्याचा जीव घेतल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक, जोने स्वतःसाठी एक खाजगी प्राणीसंग्रहालय बनवले होते. पण या ठिकाणी राहणाऱ्या वन्य प्राण्यांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जिवंत खाल्लं. अनेक दिवस जो दिसला नाही आणि त्याच्या प्राणिसंग्रहालयात काही हाडे सापडली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. लग्नात लोक हॅलीकॉप्टर भाड्याने घेतात, पण यासाठी किती पैसे खर्च करावे लागतात माहितीय? स्लोव्हाकियातील ओस्कर्डा येथे राहणाऱ्या जोसेफ बी याची हाडे पोलिसांनी त्याच्या प्राणिसंग्रहालयातून जप्त केले आहे. त्याच्या शरीरातील दोन ते चार हाडांवरून त्याची ओळख पटली. 16 मे रोजी जोचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी तो मांस खाऊ घालण्यासाठी सिंहाच्या पिंजऱ्यात गेला. यादरम्यान सिंहांनी त्याच्यावर हल्ला केला. सिंहांनी जोला आपला मुरडा बनवला आणि त्याची काही हाडे तेवढी सोडली. द सनच्या बातमीनुसार, जोकडे प्राण्यांचा सांभाळ करण्याचा लायसन्स होता. मात्र या लायसन्सची मुदत २०१९ मध्ये संपली होती. त्यानंतर ते रिन्यू केले गेले नाही. एका स्थानिकाच्या मते, जो खूपच विचित्र होता. तो कोणाशीही नीट बोलला नव्हता आणि त्याच्या जनावरांना वाईट अवस्थेत ठेवले आणि बरेच दिवस खायलाही दिले नाही. ज्यामुळे त्याची अशी अवस्था झाली असावी. तसे पाहाता ही पहिली वेळ नाही की जोच्या प्राण्यांनी माणसावर हल्ला केला होता, कारण यापूर्वी 2019 मध्ये जोच्या प्राण्यांनी त्यांचा सांभाळ करणाऱ्या एका महिलेवरही हल्ला केला होता. मात्र यावेळी त्याच्या प्राण्यांनी त्याला अख्ख गिळलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.