स्टॉकहोम, 02 जून : आपण वर्ल्ड फेमस व्हावं, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव असावं असं कुणाला वाटत नाही. यासाठी कितीतरी लोक काहीही करताना दिसतात. अगदी जीवाचा धोकाही पत्करतात. असे जीवघेणे करतब करण्याची हिंमत फक्त तरुणांमध्येच असू शकतं, असं अनेकांना वाटतं. पण शंभरी पार आजीबाईंनी मात्र सर्वांना धक्का दिला आहे (103 Year old woman Guinness World Record). तिने वर्ल्ड रेकॉर्डसाठी असं पाऊल उचललं की संपूर्ण जग थक्क झालं आहे. तरुणांनीही लाजवेल असं करतब या आजीने केलं आहे (Oldest person parachute jump). वय वर्षे 100… ज्या वयात चालता चालता अनेकांचा तोल जातो, नीट उभंही राहता येत नाही, शरीर थरथरत असतं. ज्या वयात जमिनीवर पाय थारावत नाही अशा वयाअशकत उंचावर जाणं म्हणजे त्यांच्यासाठी अशक्यच. पण हे अशक्यही शक्य करून दाखवलं ते स्वीडनच्या 103 वर्षांच्या रूथ लार्सन यांनी (103 Year old woman parachute jump world record). 103 व्या वयात तिने चक्क उंच आकाशातून जमिनीवर उडी मारण्याचं धाडस केलं आहे. ज्या वयात तिने नातवंडांना झोपाळ्यावर झुलवायला हवं त्या वयात तिने स्वतः आकाशात उडण्याचं स्वप्नं पाहिलं आणि ते प्रत्यक्षात साकारही केलं. 29 मे रोजी स्वीडनच्या मोटालामध्ये त्यांनी पॅराशूट जम्प केलं आहे. आकाशात त्या उंचावर गेल्या आणि शेकडो फूट उंचावरून पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर उडी मारली. त्या आकाशात असताना त्यांचं कुटुंब आणि मित्रपरिवार खाली जमीनवर त्यांची वाट पाहत होतं. रूथ खाली सुखरूप येईपर्यंत त्यांच्या जीवात जीव नव्हता. हे वाचा - OMG! पुंगी वाजताच डुलू लागली आजी; नागिण बनून नातवालाच डसली; पाहा Naagin Dance Video पण व्हिडीओत पाहू शकता रूथ मात्र अगदी बिनधास्तपणे हवेत उडण्यासाठी तयार होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर बिलकुल भीती नाही. उलट उत्साहच जास्त दिसून येतो आहे. त्यांच्यासोबत पॅराशूटिस्ट जोआकिम जोहानसन होता. त्यांनी यशस्वीरित्या जमिनीवर लँडिंगही केलं.
DAREDEVIL GRANNY: This 103-year-old woman beat the Guinness World Record for the oldest person to complete a tandem parachute jump. After landing, she said she wanted to celebrate "with a little cake." pic.twitter.com/ESOqf8jBhy
— CBS News (@CBSNews) May 30, 2022
जगातील सर्वाधिक वयाची पॅराशूट जम्प करणारी महिला म्हणून त्यांची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. रूथ लार्सन यांच्याआधी हा रेकॉर्ड अल्फ्रेंड अल ब्लाश्के यांनी केला होता. ज्या रेकॉर्ड करताना 103 वर्षे 181 दिवसांच्या होत्या. रूस यांचं वय 103 वर्षे 259 दिवस आहे. विश्वविक्रम केल्यानंतर लार्सनने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, स्कायडायव्हिंग करणं माझ्यासाठी अद्भुत होतं. बऱ्याच कालावधीपासून मी असं काहीतरी करण्याचा विचार करत होते. आता हा रेकॉर्ड केल्यानंतर एक केक कापून सेलिब्रेट करायचं आहे. हे वाचा - VIDEO: व्यक्तीने कॅमेऱ्यासमोर खाल्ल्या जगातील सर्वात तिखट मिरच्या; अवस्था पाहूनच अंगावर येईल काटा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवरही सीबीसी न्यूजचा हा व्हिडीओ रिट्विट करण्यात आला आहे. आजीचं हे जबरदस्त करतब वयाचा आकडा काहीच नसतो, हेच दाखवून देतो.