मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ओ तेरी! इतके जबरदस्त ठुमके लगावले की पँटही घसरली; पार्टीतील डान्सचा हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच

ओ तेरी! इतके जबरदस्त ठुमके लगावले की पँटही घसरली; पार्टीतील डान्सचा हा मजेशीर VIDEO एकदा पाहाच

डान्सचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

डान्सचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

डान्सचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 26 जून : डान्स (Dance) करायला प्रत्येकाला आवडतो. भले सर्वजण डान्सला (Dance video) आपलं करिअर बनवतात किंवा त्यासाठी रितसर प्रशिक्षण घेतात असं नाही. पण पाहून हा होईना थोड्याफार डान्स स्टेप्स (Funny dance) प्रत्येकाला जमतात आणि मग कुठे गाणं लागलं किंवा संधी मिळाली की मग डान्सचा मोह आवरत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका डान्सचा व्हिडीओ व्हायरल (Dance viral video) होत आहे. हा डान्स खूपच मजेशीर आहे.

एक व्यक्ती इतके जबरदस्त ठुमके लगावते की त्या व्यक्तीची चक्क पँटच पडते. पार्टीतील डान्सचा हा मजेशीर व्हिडीओ पाहून तुम्ही पोट धरून हसाल. तुम्हाला हसू बिलकुल आवरणार नाही.

@PadmraniK या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा, असं कॅप्शन यामध्ये दिलं आहे.

हे वाचा - ढुसकी सोडणारा नवरा नको गं बाई!; Matrimonial ad मध्ये तरुणीने ठेवली विचित्र अट

व्हिडीओत पाहू शकता एक व्यक्ती स्टेजवर डान्स करते आहे. व्हिडीओ पाहूनच हा एखाद्या पार्टीतील व्हिडीओ आहे हे समजतं. व्यक्ती खूप छान डान्स करताना दिसते. अगदी स्टेप बाय स्टेप डान्स सुरू आहे. सुरुवातीलाच डान्स करताना या व्यक्तीची पँट कमरेतून खाली येताना दिसते पण ती व्यक्ती डान्स करता करताच कशीबशी आपली पँट सावरून घेते. पँट सावरत सावरतच ही व्यक्ती पूर्ण डान्स करताना दिसते. अखेर व्यक्तीचा डान्स संपतो आणि शेवटच्या स्टेपसाठी ती आपल्या पँटवरून दोन्ही हात सोडते. व्यक्ती डान्स थांबवताच तिची पँट कमरेतून खाली कोसळते.

हे वाचा - मटण नाही तर लग्नही नाही; भडकलेल्या नवरदेवाचा भरमंडपात सप्तपदींसाठी नकार

व्यक्ती डान्स भारीच करतो त्यात वादच नाही. त्याच्या या सुंदर डान्सला सर्व दादही देत असतात. पण डान्सच्या शेवटी जे घडतं ते पाहून सर्वजण हसू लागतात. त्यावर बऱ्याच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.

First published:

Tags: Funny video, Viral, Viral videos