• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • अरे बकासुरा! इतकं खाल्लं इतकं खाल्लं की वैतागून रेस्टॉरंटनं अखेर ग्राहकाला केलं बॅन

अरे बकासुरा! इतकं खाल्लं इतकं खाल्लं की वैतागून रेस्टॉरंटनं अखेर ग्राहकाला केलं बॅन

रेस्टॉरंटने दिलेल्या ऑफरचा ग्राहकाने इतका लाभ लुटला की रेस्टॉरंटचं दिवाळंच निघालं.

 • Share this:
  बीजिंग, 23 नोव्हेंबर : एकदाच पैसे द्या आणि मनसोक्त, भरपेट हवं तितकं खा. अशी ऑफर म्हणजे खाद्यप्रेमींसाठी मोठी संधीच. काही रेस्टॉरंट्समध्ये बुफेचा (Buffet restaurant) ऑप्शन असतो. जिथं ग्राहकांकडून एकदाच पैसे घेतले जातात आणि त्यांना हवं तितकं खाण्याची मुभा असते. कधी कधी तर आपण जितके पैसे दिले तितकं खाल्लंच नाही किंवा पैसे दिले त्यापेक्षा जास्तच खाल्लं (Man overeating) अशीच भावना ग्राहकांची असते. पण एका ग्राहकाने रेस्टॉरंटच्या या ऑफरला (Man eating to much) इतकं गांभीर्याने घेतलं की रेस्टॉरंटलाही धक्का बसला. दिलेल्या पैशात अमर्यादित खाण्याची सूट मिळताच ग्राहकाने हद्दच केली. रेस्टॉरंटने दिलेल्या या ऑफरचा पुरेपूर फायदा त्याने करून घेतला. त्याने इतकं खाल्लं इतकं खाल्लं की त्याचं खाणं पाहून रेस्टॉरंटही वैतागलं (Restaurant ban overeating man). या खादाड आणि भुक्कड ग्राहकाला बॅन करण्याचाच निर्णय अखेर रेस्टॉरंटला घ्यावा लागला (Man eat a lot at restaurant gets banned). चीनच्या चांगशा शहरातील ही घटना आहे. इथं हंडाडी सीफूड बीबीक्यू बुफे रेस्टॉरंट आहे. इथं तुम्ही मनसोक्त आणि भरपेट खाऊ शकता  (All-You-Can-Eat Restaurant). कांग नावाचा एक ग्राहक या रेस्टॉरंटमध्ये गेला  (Food Streamer gets banned in restaurant).  कांग हा फूड स्ट्रिमर आहे. जास्तीत जास्त खाऊन त्याचा व्हिडीओ बनून तो लोकांचं मनोरंजन करतो. रिपोर्टनुसार कांगने सांगितलं की, जेव्हा तो पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये गेला तेव्हा त्याने 1.5 किलोपेक्षा जास्त पोर्क खाल्लं आणि दुसऱ्या गेला तेव्हा त्याने साडेतीन ते चार किलो प्रॉन्स खाल्ले. हे वाचा - पैसे नाही पण प्रश्नांची योग्य उत्तरं द्या आणि ई-रिक्षातून फ्रीमध्ये प्रवास करा कांगचं खाणं पाहून रेस्टॉरंट्सही हादरलं. शेवटी त्यांनी कांगला आपल्या रेस्टॉरंटमध्ये येण्यापासून बंदी घातली. कारण कांग इतकं खात होता की त्याचा फटका रेस्टॉरंटला बसत होता. रेस्टॉरंटचं नुकसान होत होतं. कुणीही आपली भूक आणि पोटाच्या क्षमतेपेक्षा जास्त तर खाऊ शकत नाही. हेच लक्षात घेऊन रेस्टॉरंट माणसांची खाण्याच्या क्षमतेइतकेच म्हणजे एखादी व्यक्ती किती खाऊ शकते, याचा अंदाज घेऊनच पैसे घेतात. हॉटेलच्या मालकाने सांगितलं की कांग खूप खात असल्याने त्याला बॅन करण्यात आलं. जेव्हा तो पोर्क खातो तेव्हा पूर्ण ट्रे रिकामा करतो आणि प्रॉन्स खाताना चिमट्याऐवजी तो हातानेच खातो. इतकंच नव्हे तर 20-30 बॉटल्स सोया मिल्कही तो पितो. यामुळे रेस्टॉरंटचं हजारों रुपयांचं नुकसान होतं. हे वाचा - Oh no! माशांना तोंडाने भरवण्याची हौस पडली भारी; तरुणासोबत काय घडलं पाहा VIDEO एका स्थानिक वाहिनीशी बोलताना कांगने सांगितलं की, त्याच्या भूकेबाबत भेदभाव केला जातो आहे. तो कधीच पदार्थ वाया घालवत नाही. त्याला खाण्याची आवड आणि तो जास्त खातो. जास्त खाणं ही माझी चूक नाही, असं त्याने म्हटलं.
  Published by:Priya Lad
  First published: