मराठी बातम्या /बातम्या /Viral /

ग्राहकाने 1192 KM वरुन ऑर्डर केलं जेवण; सोबतच ठेवली विचित्र अट, डिलिव्हरी बॉयचं भन्नाट उत्तर व्हायरल

ग्राहकाने 1192 KM वरुन ऑर्डर केलं जेवण; सोबतच ठेवली विचित्र अट, डिलिव्हरी बॉयचं भन्नाट उत्तर व्हायरल

जेव्हा डिलिव्हरी बॉयला ही ऑर्डर मिळाली तेव्हा तो बिचारा या विचारात पडला की इतक्या दूर जेवण पोहोचवण्यासाठी तो गेला तर याला किती पैसे लागतील.

जेव्हा डिलिव्हरी बॉयला ही ऑर्डर मिळाली तेव्हा तो बिचारा या विचारात पडला की इतक्या दूर जेवण पोहोचवण्यासाठी तो गेला तर याला किती पैसे लागतील.

जेव्हा डिलिव्हरी बॉयला ही ऑर्डर मिळाली तेव्हा तो बिचारा या विचारात पडला की इतक्या दूर जेवण पोहोचवण्यासाठी तो गेला तर याला किती पैसे लागतील.

    नवी दिल्ली 15 नोव्हेंबर : जगात विविध प्रकारचे लोक असतात. अनेक गोष्टींचा विचार करूनच आपल्याला त्या अशक्य वाटतात मात्र काही लोक दुसऱ्यांकडून या गोष्टींची अगदी सहज अपेक्षा करतात. अशीच काहीशी विचित्र मागणी एका व्यक्तीनं रेस्टॉरंटच्या डिलिव्हरी बॉयकडे (Delivery Boy) केली. त्याने 1000 किलोमीटर दूर असलेल्या रेस्टॉरंटमधून स्वतःसाठी जेवण मागवलं (Man Ordered Food from 1000 Km Away) आणि त्याच रात्री जेवण घरी पोहोचवण्याची मागणी केली. ज्याला कुत्रा समजून पाळलं तो निघाला अतिशय घातक प्राणी; घेतले अनेक जीव जेव्हा डिलिव्हरी बॉयला ही ऑर्डर मिळाली तेव्हा तो बिचारा या विचारात पडला की इतक्या दूर जेवण पोहोचवण्यासाठी तो गेला तर याला किती पैसे लागतील. त्याने जेव्हा सगळा हिशेब केला तेव्हा जेवण मागवणाऱ्या व्यक्तीला अतिशय मजेशीर उत्तर दिलं. Kaelum Grant नावाच्या या डिलिव्हरी बॉयने स्वतःच TikTok वर लोकांना आपल्यासोबत घडलेली ही अजब घटना सांगितली. सहसा 10-15 किलोमीटरच्या अंतरापर्यंत जेवण पोहोचवणं सोपं असतं. मात्र अमेरिकेच्या ओहियामध्ये केलम ग्रांट ( Kaelum rant ) नावाच्या व्यक्तीला जेव्हा 741.1 मीलाच्या अंतरावर जेवण पोहोचण्याची ऑर्डर मिळाली तेव्हा तो हैराण झाला. ही फूड ऑर्डर त्याला रो़डे आयलँडवर (Rhode Island)पोहोचवायची होती. डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी या व्यक्तीनं संपूर्ण दिवस जरी प्रवास केला असता तरी त्याला 694 रुपये मिळणार होते. ऑर्डरनुसार केलमला रात्री सुमारे दहा वाजेपर्यंत हे जेवण पोहोचवायचं होतं. अशात त्यानं ग्राहकाला जबरदस्त उत्तर दिलं. फोटो काढतानाच शेजारी फुटला फटाका अन्..; पाहा कशी झाली तरुणीची अवस्था, VIDEO TikTok अकाऊंटवरुन ही घटना सांगत केलमनं म्हटलं की आयलँडवर राहणाऱ्या या ग्राहकाला त्यानं असा सल्ला दिला की तू स्वतःच आपल्यासाठी सँडविच बनवायला हवं. कारण, जेवण त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. हे विसरून जा की जेवण येत आहे. तुम्ही मला 625 रुपयांसाठी 1192 किलोमीटरच्या ट्रिपवर पाठवत आहात? केलनचं हे उत्तर चांगलंच व्हायरल झालं आहे. हा व्हिडिओ 45 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Food, Viral news

    पुढील बातम्या