लंडन, 30 एप्रिल : कोरोनामुळं सध्या सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळं लोकं जवळजवळ दोन महिने घरात कैद आहेत. नेहमीप्रमाणे फिरत किंवा बाहेर जाता येत नसल्यामुळं काहींचा संयम सुटत चालला आहे, तर काही लोकं यासाठी भलत्याच कल्पना काढत आहेत. अशाच एक अवलियानं लॉकडाऊनमध्ये शेजाऱ्यांसोबत Social Distancing बार उघडला.
ट्वीटरवर सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मुख्य म्हणजे यांनी आपल्या घरासमोर असलेल्या जागेत कुंपण तोडून हा बार तयार केला. म्हणजे एका क्षणात वाटणारं कुपणं दुसऱ्याच क्षणात बार होताना दिसतं. आपल्या बागेत त्यांनी रेलिंगचे टेबल वापरून बसण्याची जागा तयार केली. तेथे ही लोकं दारू पिण्यासाठी बसतात. दरम्यान हा व्हिडीओ कुठला हे अद्याप कळु शकलेले नाही आहे. मात्र घरात बसून कंटाळा आल्यावर लोकं काय करू शकतात, हे मात्र या व्हिडीओतून कळत आहे.
वाचा-बंद हॉटेलमध्ये बसला लपून, 4 दिवसात संपवल्या 70 दारूच्या बाटल्या
These neighbours made the perfect DIY social distance bar in their garden. Absolute legends! pic.twitter.com/Jz8fkvJDv4
— The Viral Group (@TheViralGroupUK) April 26, 2020
वाचा-लॉकडाऊनमध्ये 1 लाख लीटर बिअर वाया, कंपन्यांनी घेतला नाल्यात फेकण्याचा निर्णय
हॉटेलमध्ये लपून संपवली दारू
अमेरिकेतील न्यू हेव्हन पोलीस स्थानकाने एका इसमाला अटक केली. याचे नाव लुइस एजेंल आहे. जेव्हा पोलिसांनी या इसमाला अटक केली, तेव्हाही तो दारूच पित होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इसमाने जवळजवळ 70 दारूच्या बाटल्या फस्त केल्या. लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत लुइस हॉटेलच्या मागच्या दरवाज्यानं आत शिरला. यावेळी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून सुरक्षा रक्षकांना याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिसांना याबबात माहिती दिली.
वाचा-लॉकडाऊनमध्ये दारू न मिळाल्याने 5 मित्रांची 'मिथेनॉल' पार्टी, दोघांचा मृत्यू