चेन्नई, 15 एप्रिल : कोरोना (Covid - 19) व्हायरसचा प्रादुर्भाव देशभरात वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊनची (Lockdown) मर्यादा वाढवली आहे. या काळातही अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लॉकडाऊनदरम्यान दारुची दुकानं बंद असल्याने पाच मित्र मिथेनॉल प्यायले. यामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे तिघेजण रुग्णालयात भरती आहेत.
ही घटना तामिळनाडूतील कडलूर शहरातील आहेत. सांगितले जात आहे की, पाचही मित्रांना दारुचं व्यसन होतं. ते दररोज दारूची पार्टी करीत असतं. मात्र त्यांच्याकडील स्टॉक संपल्याने पाचही मित्र मंगळवारी मिथेनॉल प्यायले. त्यामुळे सर्वांची तब्येत बिघडली. या पाचही जणांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे आणि तिघांची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाचही जण पेस्टिसाइड फर्ममध्ये काम करीत होते. तेथूनच ते मिथेनॉल घेऊन आले होते. पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.
तामिळनाडूमध्ये यापूर्वीही दारु न मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने दारु न मिळाल्याने सॅनिटाझर प्यायला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात वाईन शॉप सुरू करावे अशी मागणी अनेकांकडून केली जात आहे.
संबंधित -
धक्कादायक! लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या मजुराच्या पत्नीवर बलात्कार
मैत्रीचे बंध! मुस्लीम तरुण बौद्ध भिख्खू मित्रासाठी विहारात घेऊन गेला जेवण