Home /News /viral /

गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये बसून केलेल्या त्या कामानं पालटलं नशीब; तरुणाने कमावले 10 अब्ज रुपये

गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये बसून केलेल्या त्या कामानं पालटलं नशीब; तरुणाने कमावले 10 अब्ज रुपये

जॉनीने आपल्या गर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये पडून असतानाच हॉपिन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप बनवलं.

  नवी दिल्ली 28 जानेवारी : आजकाल जगभरात एका अब्जाधीशाची चर्चा होत आहे, ज्याने आपल्या गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये (Man Earned Money from Girlfriend's Bedroom) बसून 10 अब्ज रुपये कमावले आहेत. इंग्लंडच्या या अब्जाधीशाची कहाणी जाणून घेण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक आहे. या व्यक्तीने गर्लफ्रेंडच्या बेडवर पडून इतके पैसे कसे कमवले, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पाण्यात कोसळलेल्या साथीदाराला वाचवण्यासाठी श्वानाची धडपड; शेवटी काय घडलं? Video जॉनी बपफारहाट असं या व्यक्तीचं नाव आहे. जॉनीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपद्वारे (Video Conferencing App) इतके पैसे कमावले आहेत. जॉनीची इंग्लंडच्या श्रीमंत तरुणांमध्ये गणना होते. 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण जग कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये होतं. तेव्हा बहुतेक लोक घरून काम करत होते. हे पाहता जॉनीने आपल्या गर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये पडून असतानाच हॉपिन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप बनवलं. या अॅपसाठी आधी जॉनीने निधी जमा केला. मग हे अॅप बनताच भरपूर पैसे कमवले. जॉनी मँचेस्टर विद्यापीठातून पदवीधर आहे. अॅपची कल्पना त्याला 2018 मध्येच सुचली, मात्र त्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते. 2018 साली त्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या बेडरूममध्ये पडून अॅप कोडिंग केलं होतं. हे झूम कॉलसारखंच अॅप आहे. याद्वारे लाइव्ह व्हिडिओ कॉल करता येणार आहेत.

  'हा माझा सिक्रेट मसाला'; वेटरने जेवणात मिसळली किळसवाणी गोष्ट, वाचून बसेल धक्का

  लॉन्च झाल्यापासून एका वर्षातच 50 लाखांहून अधिक लोकांनी याचा वापर सुरू केला आहे. यासह अॅपचं मूल्य 4 ट्रिलियन 12 अब्ज 46 कोटी 79 लाख 57 हजार रुपयांच्या पुढे गेलं आहे. या अॅपच्या निर्मितीनंतर जॉनीची श्रीमंतांच्या यादीत 113 व्या क्रमांकावर गणना झाली. जॉनीने आता अचानक या अॅपद्वारे 10 अब्ज रुपये कमावले आहेत. त्याने आता कंपनीचा काही स्टॉक विकला आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Girlfriend, Money

  पुढील बातम्या