नवी दिल्ली 16 एप्रिल : आजच्या काळात ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping) खूप लोकप्रिय झाली आहे. ऑनलाइन जगात, तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी अगदी कमी किमतीत घरबसल्या मिळतात. तुम्हाला अगदी नवीन वस्तू घ्यायची असो किंवा सेकंड हँड वस्तू, इथे सगळंच अगदी सहज मिळतं. अलीकडेच, अशाच एका ऑनलाइन विक्रीची बातमी खूप चर्चेत होती, ज्यात एका व्यक्तीने चुकून आपल्या पत्नीलाच सेलमध्ये टाकलं (Wife for Sell). हद्द तेव्हा झाली जेव्हा लोकांनी त्या व्यक्तीच्या पत्नीला विकत घेण्यासाठी चार लाख रुपये देण्याची ऑफर दिली. Viral Video : रागात रिमोट फेकला अन् ‘गेम’ झाला, काही सेकंदात झालं एक लाखाचं नुकसान इंग्लंडमधील स्विंडन टाऊनमध्ये राहणाऱ्या या जोडप्याला त्यांच्या घरातील जुनं बुकशेल्फ ऑनलाइन विकायचं होतं. 34 वर्षीय मॅटने फोटो क्लिक करायला सुरुवात केली तेव्हा त्याची पत्नी जेसने गंमतीनं बुकशेल्फसोबत पोझ दिली. तिचं म्हणणं होतं की यामुळे हे बुकशेल्फ लवकरच विकलं जाईल. मॅटनेही बुकशेल्फवर एक पाय ठेवून पोज दिलेल्या आपल्या पत्नीचा फोटो काढला आणि ऑनलाइन पोस्ट केला. मात्र, पुढे जे घडलं ते थक्क करणारं होतं.
मॅटने फेसबुकवर आपल्या पत्नीचा बुकशेल्फसोबत पोज देतानाचा फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं की तो हे डिलिव्हरही करू शकतो. हा फोटो पोस्ट झाल्यानंतर अनेकांनी या विक्रीच्या जाहिरातीत रस दाखवला. हे बुकशेल्फ आठ हजारांपर्यंत विकले जाईल, अशी मॅटची अपेक्षा होती. पण त्याला चार लाख रुपयांची ऑफर आल्यावर त्याला आश्चर्य़ाचा धक्का बसला. जेव्हा त्याने ती ऑफर काळजीपूर्वक वाचली तेव्हा समजलं की कोणीतरी त्याच्या पत्नीला विकत घेण्यासाठी ही किंमत देत आहे. बॉयफ्रेंडची कपडे धुताना त्यात सापडली भलतीच वस्तू; पाहताच सरकली गर्लफ्रेंडच्या पायाखालची जमीन ही जाहिरात पाहिल्यानंतर असे अनेक लोक दिसू लागले, ज्यांना बुकशेल्फमध्ये कमी आणि त्या व्यक्तीच्या पत्नीमध्ये जास्त रस होता. काही वेळातच ही पोस्ट व्हायरल झाली. या घटनेवर टिप्पणी करताना मॅटच्या पत्नीने लिहिलं की, तिला खूप चांगलं वाटत आहे. तिला असं वाटतंय जणू ती एक सेलिब्रिटी आहे. या जोडप्याने सांगितलं की पोस्ट व्हायरल झाल्यानंतरही अद्याप त्यांचं बुकशेल्फ विकलं गेलं नाही. आशा आहे की कोणीतरी ते लवकरच विकत घेईल.