नवी दिल्ली, 26 जुलै : कावळा… ज्याचा संबंध मृत्यू किंवा अशुभ घटनांशी जोडला जातो. सामान्यपणे पितृपक्षाला किंवा मृतांचं स्मरण करतानाच माणसांना कावळा आठवतो. एरवी कावळ्याला कुणी विचारतही नाही. पण तुम्हाला वाचूनच आश्चर्य वाटेल अशा या कावळ्याच्या प्रेमात पडली एक व्यक्ती. एक गुंड ज्याचा कावळ्यावर जीव जडला. कावळ्यासाठी त्याने असं काय काय केलं की तुम्ही थक्कच व्हाल. सॅल्फोर्ड शेरीफ असं या व्यक्तीचं नाव. तो एक गुंड आहे. यूकेतील एका गुंड टोळीचा सदस्य. एक काळ असा होता की तो कावळ्यांचा तिरस्कार करत असे. त्याने नेहमीच चित्रपटांमध्ये पाहिले होते आणि लोकांकडून ऐकले होते की कावळे वाईट चिन्हांना आमंत्रित करतात आणि त्यांची उपस्थिती वाईट आहे. त्यामुळे शेरीफ नेहमीच त्यांच्यापासून दूर राहिला.
पण अचानक त्याची एका कावळ्याशी मैत्री झाली. हा कावळा त्याला रस्त्याच्या मधोमध जखमी अवस्थेत सापडला. तेव्हापासून शेरीफने त्याला आपल्याजवळ ठेवलं, त्याची काळजी घेतली. डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, त्याने कावळ्याचं नाव रसेल असं ठेवलं. रसेल त्याच्याबरोबर सर्वत्र जातो. त्याने त्याला बाटलीतून पाणी पिण्यासही शिकवलं. जेव्हा तो कामावर जातो तेव्हा तिथंही रसेल येतो आणि तिथं बसून टाईमपास करतो. आर्टिस्ट डुक्कर! काढली अशी पेटिंग्स, खरेदीसाठी गर्दी; किंमत तब्बल 10 कोटी शेरीफ कुप्रसिद्ध टोळीचा सदस्य. त्याच्यावर सतत मृत्यूची टांगती तलवार. आपण कुणाला आयुष्य देऊ शकतो, याची खात्री त्याला स्वतःलाही नव्हती. कावळ्याला सांभाळल्यानंतर त्याला जाणवलं की आपल्या आतही एक सकारात्मक स्वभावाची व्यक्ती आहे. त्याने टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत ज्यात तो कावळ्यांची सेवा करताना दिसत आहे. शेरीफ त्याच्या प्रेमातच पडला. त्याचं हे प्रेम म्हणजे तुम्ही समजता तसं गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडवालं प्रेम नव्हे तर पाळीव पशूपक्षी आणि मालकातील प्रेम. त्याचं कावळ्यावर इतकं प्रेम की त्याने त्याच्यावर हजारो रुपये उधळले. Shocking! घरातील पलंग समजून रात्रभर तो जिवंत मगरीवर झोपला; सकाळ होताच… शेरीफनं सांगितलं, तो दर आठवड्याला 5,000 रुपये किमतीचं अन्न कावळ्याला खायला देतो. त्याला दर दोन तासांनी खायला द्यावं लागतं. पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत तो त्याला काही ना काहीतरी खाऊ घालत असतो. त्याने 8 आठवडे कावळ्याला खायला दिलं, पण आता तो कावळा त्याच्या घरट्यातून उडू लागला आहे. कावळा आता उडून गेला पण शेरीफला त्याची खूप आठवण येते.