लखनऊ, 26 जुलै : मगरी किती धोकादायक असतात हे तुम्हाला माहीत असेलच. सोशल मीडियावर मगरी चे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होतात. व्हिडीओमध्येच मगरींना पाहून घाम फुटतो. विचार करा, अशी मगर अचानक तुमच्यासमोर आली तर काय होईल? असाच काहीसा प्रकार नुकताच उत्तर प्रदेशातील एका गावात राहणाऱ्या एका कुटुंबासोबत घडला, जेव्हा त्यांना त्यांच्या घरातील पलंगाखाली मगर दिसली. पावसाळ्यात नद्यांना पूर येऊन पुराच्या पाण्यातून मगरी गाव, शहरात आल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. यूपीच्या फुटहा गावाजवळील शारदा नदीलाही असाच पूर आला आहे. त्यामुळे गावात मगरी येत असतात. अशीच एक मगर गावात आली आणि एका घरात घुसली. सगळ्यात भयावह गोष्ट म्हणजे रात्रभर ती पलंगाखाली होती आणि कोणालाही सुगावा लागला नाही. जंगलाच्या राजाच्या हद्दीत घुसली मगर, सिंहाची शिकार पळवण्याचा प्रयत्न; पुढे काय घडलं पाहा VIDEO लाला राम यांच्या घरात ही मगर होती. मगरीला घरात येताना कुणीच पाहिलं नाही. ती पलंगाखाली जाऊन बसली. मगर होती त्याच पलंगावर लाला राम झोपला होता. रात्रभर लाला राम पलंगावर आणि मगर पलंगाखाली होते. रात्रभर पलंगावर झोपूनही लाला राम यांना पलंगाखाली मगर आहे, आपण मगरीच्या अगदी वर झोपलो आहोत, याची माहितीच नव्हती. सकाळी लाल राम उठला आणि त्याला धक्काच बसला. ज्या पलंगावर तो झोपला त्या पलंगाखाली भलीमोठी मगर पाहून त्याला घामच फुटला. लाला राम मोठमोठ्याने ओऱडू लागला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील सर्व सदस्य धावत आले. तेसुद्धा घाबरले. त्यांनी लगेच पोलीस आणि वनविभागाला याची माहिती दिली. Viral Video : पाण्यात पाय टाकून बसला होता व्यक्ती; इतक्यात मगर आली अन्…, काय केलं पाहा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाला पोहोचायला उशीर झाला. दरम्यान गावातील लोक तिथं जमा झाले. सर्वांनी मिळून त्या मगरीला पकडण्याचा प्रयत्न केला. मगरीच्या तोंडाला दोरी बांधली आणि पकडून तिला पोत्यात टाकून ठेवलं. त्याचवेळी वनविभागाचे लोक तेथे पोहोचले. गावकऱ्यांनी मगरीला पकडल्याचं त्यांनी पाहिलं. यानंतर पोत्यात भरलेल्या मगरीला शारदा नदीच्या तीरावर नेण्यात आलं. तिला नदीच्या पाण्यात सोडलं. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.