लंडन, 20 जानेवारी : नव्या वर्षात वजन कमी करण्याचा संकल्प अनेकांनी केला असेल. आता नव्या वर्षाचा पहिल्या महिन्याचा शेवट जवळ आला आहे. तुम्ही वजन घटवण्यासाठी केलेल्या संकल्पापैकी किती संकल्पामध्ये सातत्य ठेवलं? तुम्ही जे ठरवलं ते करणं तुम्हाला कठीण जातं आहे, बस्सं काही दिवस प्रयत्न करून तुम्ही संकल्प सोडूनही दिला असेल. नाही का? पण काळजी करू नका. आता तज्ज्ञांनी वजन घटवण्याचा असा सोपा फॉर्म्युला दिला आहे की तुम्हाला तो मोडणं शक्य नाही आणि तुम्ही तो तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करालच.
लौबोरा युनिव्हर्सितील खेळ, व्यायाम, आरोग्य विज्ञान पीएचडी संशोधक हेनरीएटा ग्रामह यांनी वजन घटवण्याचा एक सहजसोपा असा मंत्र दिला आहे. ज्यात तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. म्हणजे अगदी तुमची जीवनशैली तशीच ठेवून फार जास्त बदल न करता तुम्ही वजन कमी करू शकता.
लौबोरा युनिव्हर्सितील खेळ, व्यायाम, आरोग्य विज्ञान पीएचडी संशोधक हेनरीएटा ग्रामह सांगतात, बहुतेक लोक जे आपल्या वजनावर नियंत्रण ठेवतात ते आपला आहार किंवा शारीरीकि कार्यांच्या सवयीत मोठे बदल करतात. पण मोठ्या बदलांमध्ये सातत्य ठेवणं मुश्किल होऊ शकतं, कारण यासाठी उच्च स्तराच्या प्रेरणेची गरज असते. प्रेरणा स्वाभाविकरित्या वाढते आणि कमी होते. त्यामुळे जीवनशैलीतील मोठे बदल कायम ठेवणं कठीण होणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही.
अशा वेळी छोटो बदलांचा दृष्टीकोन उपयोगी ठर शकतो. ज्यामध्ये लोकांनी आपल्या आहारात कॅलरीचं प्रमाण 100-200 कमी करायला हवं की प्रतिदिम 100-200 अतिरिक्त कॅलरी बर्न करायला हव्यात, हे ठरवायला हवं. याचा अर्थ फक्त एक किंवा दोन कमी चॉकलेट्स-बिस्कीट्स खा किंवा दर दिवशी 10-20 मिनिटं अतिरिक्त चालणं आलं.
कमी कॅलरी शरीरात जाण्यासाठी किंवा जास्त कॅलरी घटवण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात छोटे बदल करण्याची गरज आहे. हे छोटे बदल आत्मसात करणं सोपं पडेल आणि मोठ्या बदलांच्या तुलनेत तुम्हाला तुमची सामान्य जीवनशैली सोता अधिकचा वेळ किंवा प्रयत्न करण्याची गरज नाही पडणार.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.