जाहिरात
मराठी बातम्या / Viral / व्हेल मासा समोर येताच आधी हात फिरवला, मग किस करायला गेला व्यक्ती अन्..; कॅमेऱ्यात कैद झाली घटना..VIDEO

व्हेल मासा समोर येताच आधी हात फिरवला, मग किस करायला गेला व्यक्ती अन्..; कॅमेऱ्यात कैद झाली घटना..VIDEO

व्हेल मासा समोर येताच आधी हात फिरवला, मग किस करायला गेला व्यक्ती अन्..; कॅमेऱ्यात कैद झाली घटना..VIDEO

इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक माणूस समुद्रात एका धोकादायक व्हेलला किस करताना दिसत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 27 एप्रिल : सागरी जगामध्ये अनेक रहस्ये आहेत आणि ती खूप सुंदर देखील आहेत. इथे खोलात लपलेलं एक वेगळंच जग आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी राहतात. यातील काही धोकादायक तर काही अतिशय आकर्षक असतात. या प्राण्यांना पाहण्यासाठी अनेक लोक आणि जलतरणपटू अनेकदा समुद्राभोवती फिरायला जातात आणि त्यांच्यासोबत वेळ घालवतात. कधी ते खोलवर जाऊन सागरी जगाचा आनंद घेतात तर कधी बोटीवर बसून ते दूरवर पसरलेल्या समुद्राचा आणि त्याच्या सौंदर्याचा आनंद घेतात. यातील काही इतकं धाडस करतात, की समुद्रातील धोकादायक प्राण्यांशीही त्यांची जवळीक वाढताना दिसते.

News18लोकमत
News18लोकमत

नुकताच kaushman नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक माणूस समुद्रात एका धोकादायक व्हेलला किस करताना दिसत आहे. आधी त्याने सिल्व्हर व्हेलला जवळ बोलावलं. त्यानंतर त्याला दोन्ही हातांनी धरून, प्रेमाने मिठी मारून त्याचं चुंबन घेतला. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

जाहिरात

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये समुद्राच्या मध्यभागी एक व्यक्ती बोटीवर उपस्थित आहे आणि एक धोकादायक सिल्व्हर व्हेल त्याच्या अगदी जवळ दिसत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे व्हेलच्या भीतीने पळून जाण्याऐवजी ती व्यक्ती आपला लाडका आणि आवडता प्राणी असल्याप्रमाणे त्याला दोन्ही हातांनी धरून बसलेली दिसली. व्हेलनेही त्या व्यक्तीला इजा करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट, तो मानवाकडून मिळणाऱ्या प्रेमाचा आनंद घेताना दिसतो. या व्हिडिओचा सर्वात अद्भुत आणि सर्वोत्तम क्षण तो होता जेव्हा त्या व्यक्तीने सिल्व्हर व्हेलला किस करायला सुरुवात केली. ज्यानंतर हा व्हिडिओ व्हेल आणि माणसाचा किसिंग व्हिडिओ म्हणून व्हायरल झाला. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे, त्याच बरोबर त्या व्यक्तीचं धाडस देखील चकित करणारं आहे. या व्हिडिओला सुंदर असं कॅप्शनही देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात