नवी दिल्ली 14 मे : साप समोर दिसताच बहुतेकांना घाम फुटतो आणि लोक चांगलेच घाबरतात. तो चावला नाही तरी त्याला पाहूनच अनेकांचा थरकाप उडतो. मात्र, आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, त्यामध्ये एक वेगळंच दृश्य दिसत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती एका मोठ्या सापाला किस करताना दिसत आहे. साप पकडण्यात माहीर असलेले अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. त्यांच्यासाठी विषारी साप पकडणं म्हणजे डाव्या हाताचा खेळ आहे. असे धाडसी लोक सापांना घाबरत नाहीत, उलट त्यांच्याशी इतके मैत्रीपूर्ण बनतात की ते सापांच्याही प्रेमात पडू लागतात. या व्हिडिओमध्येही तेच पाहायला मिळत आहे. प्रँक करण्याची हौस महागात पडली; तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार, VIDEO बघून डोक्याला हात लावाल व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती नदीच्या काठावर बसलेला दिसतो. त्याच्यासोबत 12 फूट लांब किंग कोब्राही आहे. तो या विषारी सापाशी लहान मुलासारखा खेळताना दिसतो, नंतर तो मागून हळूवारपणे सापाला किस करताना दिसतो. विशेष म्हणजे साप यावर कोणतीही हिंसक प्रतिक्रिया देत नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावरही काटा उभा राहील.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर nickthewrangler नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 5 दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे, जो लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाइक केला आहे. हा धोकादायक व्हिडीओ पाहून लोकांनीही यावर निरनिराळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेक वापरकर्त्यांनी त्या व्यक्तीला धाडसी म्हटलं आहे आणि त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.