नवी दिल्ली 02 मार्च : दीर्घकाळ कुणासोबत राहिल्यानंतर ब्रेकअपचा निर्णय घेणं कुणालाही अवघड जाऊ शकतं. अनेकदा असं म्हटलं जातं की ब्रेकअपनंतर दोघांचं हे नातं खरंच संपलंय हे स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे. हे आपल्याला पुढे जाण्यास मदत करतं. जर आपण स्पष्ट नसलो तर अनेक वेळा आपल्याला दोषी वाटतं. संताप आणि पश्चात्तापाच्या भावना मनात येतात, ज्या आयुष्यभरासाठी जखमा बनतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, हे अगदी स्पष्ट असलं पाहिजे की, आपण आता एकत्र राहू शकत नाही आणि जे काही होतं ते संपलं आहे. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एका व्यक्तीने आपल्या प्रेयसीला आपल्या ब्रेकअपची पुष्टी करण्यासाठी एक पत्र पाठवलं आहे. त्यावर प्रेयसीला स्वाक्षरी करण्यास सांगितलं, जेणेकरुन हे नातं खरोखरच संपलं आहे याची अधिकृत खात्री होईल. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. हे पाकिस्तानी लग्न ठरतंय चर्चेचा विषय; नवरीच्या वजनाइतकं दिलं सोनं, VIDEO पाहून नेटकरी म्हणतात… ट्विटरवर, वेलिन (@velin_s) नावाच्या वापरकर्त्याने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतच्या चॅटचा स्क्रीनशॉट तसंच त्यानं लिहिलेलं पत्र शेअर केलं. वेलिननं लिहिले, अशी काही कारणं आहेत ज्यामुळे मला वाटलं की आपण आपल्या नात्याचा पुनर्विचार केला पाहिजे. दोघांचं बोलणं झालं आणि नातं संपुष्टात आलं. पण मला वाटलं की ते एका सुंदर नोटवर संपलं पाहिजे, म्हणून मी तिला एक पत्र लिहिलं आणि तिला त्यावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं. जेणेकरुन ते अधिकृतपणे संपून जाईल.
Guys she said yes, and it's now official pic.twitter.com/u0r2wW3o5H
— Velin (@velin_s) February 28, 2023
वेलिनचं पत्रही मजेदार आहे. त्यानं लिहिलं की, मला आशा आहे की हे पत्र मिळाल्यावर तुझी प्रकृती चांगली होईल. मला त्रास होत असलेल्या समस्येचं निराकरण करण्यासाठी मी तुमच्या मौल्यवान वेळेपैकी काही वेळ मागू इच्छितो. मला अलीकडेच काहीतरी कळालं ज्यामुळे मला आपल्या नात्याचा पुनर्विचार करायला लागला. मला कळविण्यास खेद वाटतो की आपण हे नाते पुढे चालू ठेवू शकत नाही. तुम्ही एक सुंदर व्यक्ती आहात पण मला मिळालेल्या माहितीने मला अस्वस्थ केलं. त्याने आपल्या नात्याच्या पायावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मी सत्य आणि प्रामाणिकपणाने जगणारी व्यक्ती आहे. म्हणूनच मी त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. हा निर्णय घेणं माझ्यासाठी सोपं नव्हतं. तरीही, माझा विश्वास आहे की माझ्यासाठी माझ्या आदर्शांशी खरं असणं महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. इथे आपल्याच वडिलांशी लग्न करतात मुली, कुठे आहे अशी विचित्र परंपरा? हे ट्विट व्हायरल झालं आणि अनेकांना त्याची सर्जनशीलता आणि अनोखा दृष्टिकोन आवडला. हे ट्विट आतापर्यंत 4.7 लाख वेळा पाहिलं गेलं आहे. सुमारे सहा हजार लाइक्स आणि 400 रिट्विट्स मिळाले आहेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं, टेम्पलेटसाठी धन्यवाद. मी हे माझ्या मित्राला पाठवीन, जेणेकरून तोही सिंगल होईल. याशिवाय इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.