मुंबई, 21 जुलै : व्हेल किंवा शार्क, दोन्ही समुद्रात राहणारे प्रचंड आणि धोकादायक प्राणी आहेत. कारण ते झटक्यात एखाद्याचा जीव घेऊ शकतात. ज्यामुळे लोक त्यांना पाहिलं की लांबच रहातात. मात्र एका व्यक्तीने अती उत्साहात त्यांना पाहून पाण्यात उडी घेतली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून नेटकऱ्यांना देखील धक्का बसला आहे. एक व्यक्ती समुद्राच्या मध्यभागी बोटीमध्ये असताना त्याला पाण्यात दोन मोठे व्हेल शार्क दिसले. ज्यानंतर या व्यक्तीने पाण्यात उडी घेतली आणि त्या माशावर जाऊन बसण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये तो यशस्वी देखील झाला. ज्यानंतर ती व्यक्ती नाचू लागते आणि त्या बलाढ्य माशावर न घाबरता उभी देखील रहाते. Turtle आणि Tortoise मध्ये फरक काय? दोन्ही ही आहेत वेगवेगळे प्राणी त्या व्यक्तीने व्हेलवर राईड तर केलीच, पण त्यावर नाचायलाही सुरुवात केली. त्या माणसाला जराही भीती वाटली नाही की जर व्हेल पाठीमागे मारली किंवा खोल पाण्यात शिरली तर त्याच्यासोबत काय होऊ शकते. ही व्यक्ती संपूर्ण राइड दरम्यान निर्भयी दिसत होती.
काही काळ या व्हेलवर स्वार झाल्यानंतर मग ही व्यक्ती पुन्हा आपल्या बोटीकडी परतली. हा व्हिडीओ @Levandov_1 नावाच्या अकाउंटवरुन ट्वीटरवर पोस्ट करण्यात आला आहे.