नवी दिल्ली 28 मार्च : एका 47 वर्षीय नेपाळी व्यक्तीने दारूच्या नशेत विचित्र कृत्य केलं. त्याच्या या कृत्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेत स्टीलचा ग्लास या व्यक्तीच्या गुदद्वारात गेला. यानंतर शस्त्रक्रिया करून हा ग्लास बाहेर काढण्यात आला. तीन दिवस या व्यक्तीच्या गुदद्वारात ग्लास अडकून होता.
या विचित्र प्रकरणाबाबत जर्नल ऑफ नेपाळ मेडिकल सेंटरमध्ये एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार, सुरुवातीला या व्यक्तीने सांगितलं की, ग्लास चुकून आत गेला. त्या व्यक्तीने सांगितले की चुकून तो काचेच्या ग्लासवर बसला होता. यामुळे ग्लास आत घुसला. नंतर त्याने स्वतः कबुली दिली की तो नशेत होता आणि लैंगिक समाधानासाठी हे केलं.
रिपोर्टनुसार, त्याच्या कृतीमुळे व्यक्ती दोन दिवस मल पास करू शकला नाही. त्याला दोन दिवस असह्य वेदना होत होत्या. मात्र, सुदैवाने त्याला रक्तस्त्राव झाला नाही. या व्यक्तीने डॉक्टरांना सांगितलं की त्याने स्वतः ग्लास काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
लग्नानंतर चारच दिवसांत तरुणाचा पुन्हा मेहुणीसोबत विवाह; प्रेम नाही, 'हे' आहे यामागचं अजब कारण
यानंतर डॉक्टरांनी त्या व्यक्तीचा एक्स-रे काढला. तसंच ग्लास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, ते गुदद्वाराच्या आत उलट स्थितीत होतं. यानंतर डॉक्टरांनी एक्सप्लोरेटरी लॅपरोटॉमी शस्त्रक्रिया केली. ही पोटासाठी केली जाते. पण, त्यातही अपयश आलं. त्यानंतर डॉक्टरांनी एंटरोस्टोमी शस्त्रक्रिया केली. यानंतर डॉक्टरांनी ग्लास यशस्वीपणे बाहेर काढला.
या शस्त्रक्रियेनंतर त्या व्यक्तीला 7 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आलं. सुमारे दोन महिन्यांच्या फॉलोअपनंतर, डॉक्टरांनी सांगितलं की व्यक्ती पूर्णपणे बरी आहे. डॉक्टर त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PRIVATE part, Shocking news