मराठी बातम्या /बातम्या /Viral /लग्नानंतर चारच दिवसांत तरुणाचा पुन्हा मेहुणीसोबत विवाह; प्रेम नाही, 'हे' आहे यामागचं अजब कारण

लग्नानंतर चारच दिवसांत तरुणाचा पुन्हा मेहुणीसोबत विवाह; प्रेम नाही, 'हे' आहे यामागचं अजब कारण

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

एका तरुणीचं तिच्या घरच्यांनी बळजबरीने लग्न लावून दिलं, पण सासरच्या घरी गेल्यावर तिने असं कृत्य केलं, ज्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bihar, India

पाटणा 27 मार्च : कधी कधी अशी परिस्थिती येते की नातं जोडून ठेवण्यासाठी लोकांना एकत्र यावं लागतं. दाजी आणि मेहुणी यांच्यात नेहमीच एक वेगळंच बॉन्डिंग पाहायला मिळतं, दोघंही सतत एकमेकांची मस्करी करत असतात. पण बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. यात एका तरुणीचं तिच्या घरच्यांनी बळजबरीने लग्न लावून दिलं, पण सासरच्या घरी गेल्यावर तिने असं कृत्य केलं, ज्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. खरं तर, मधवापूर ब्लॉकच्या बासुरी बिहारी उत्तरीमध्ये एक मुलगी लग्नाच्या चार दिवसांनंतर तिच्या सासरच्या घरातून पळून गेली, कारण तिचं दुसऱ्यावर प्रेम होतं.

बोंबला! गर्लफ्रेंडच्या जॉब इंटरव्ह्यूमुळे बॉयफ्रेंड तुरुंगात; पोलिसांनी केली अटक कारण...

लग्नानंतर घरच्यांनी मुलीला निरोप दिला, मात्र ती सासरच्या घरी पोहोचल्यावर तिचं अजिबातही मन लागलं नाही आणि त्यानंतर चार दिवसांनी ती प्रियकरासोबत पळून गेली. 15 मार्चला मुलीचं लग्न झालं होतं, मात्र चार दिवसांत ती फरार झाल्याचं सांगण्यात आलं. मुलीने लग्नाच्या दिवशीच घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही, असं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, सासरच्या मंडळींनी पंचायत बोलावली, त्यात ठरल्याप्रमाणे त्यांनी पळून गेलेल्या नवरीच्या बहिणीचंच तिच्या दाजीसोबत लग्न लावून दिलं. बहिणीला बळजबरीने आपल्याच दाजीसोबत लग्न करावं लागलं.

तर पळून जाणाऱ्या मुलीला तिच्या प्रियकराशी लग्न करायचं होतं. गावातील लोक या लग्नासाठी तयार झाले आणि समाजातील लोकांनीही होकार दिला. दोघांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असून संमतीनंतर दोघांनी मंदिरात लग्न केल्याचं सांगितलं जात आहे. आंतरजातीय विवाहाला गावातील सर्व लोक आले होते. लोकांनी आनंदाने त्यांना आशीर्वाद दिला.

First published:
top videos

    Tags: Marriage, Wedding