जाहिरात
मराठी बातम्या / Viral / हाच खरा प्रिन्स! पक्ष्याच्या घरट्यासाठी दुबईच्या राजकुमारने आपली मर्सिडीज दिली

हाच खरा प्रिन्स! पक्ष्याच्या घरट्यासाठी दुबईच्या राजकुमारने आपली मर्सिडीज दिली

हाच खरा प्रिन्स! पक्ष्याच्या घरट्यासाठी दुबईच्या राजकुमारने आपली मर्सिडीज दिली

दुबईच्या क्राऊन प्रिन्सच्या (dubai crown prince) या निर्णयाचं कौतुक होतं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

दुबई, 13 ऑगस्ट : राजा, राजकुमार म्हटलं की जनतेचं कल्याण ही त्याची जबाबदारी असतेच मात्र दुबईच्या राजकुमारनं फक्त जनताच नाही तर आपल्या एका पक्ष्याचाही विचार केला. दुबईचे क्राऊन प्रिन्स  (Dubai Crown Prince) शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी एका पक्ष्याच्या घरट्यासाठी आपली मर्सिडीज एसयूव्ही (Mercedes SUV) दिली आहे. दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान इन्स्टाग्रामवर खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांना इन्स्टाग्रामवर फजा नावानं ओळखलं जातं. त्यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांची मर्सिडीज एसयूव्ही (Mercedes SUV) कार आहे आणि या कारच्या विंडशिल्डवर एका पक्षिणीनं घरटं बांधलं आहे. आपल्या पिल्लांसह ती या घरट्यात राहते. नुकतीच तिची पिल्लं या अंड्यातून बाहेर आली आणि ती आपल्या पिल्लांची देखभाल करते आहे. त्यांना खाऊ घालते आहे.

जाहिरात

या पक्षिणीच्या घरट्यासाठी प्रिन्स शेख हमदान यांनी आपली मर्सिडीज कार वापरण्यास नकार दिला आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी आपली गाडी एका बाजूला ठेवली आहे, जेणेकरून पक्षी शांतपणे राहतील त्यांना कोणतीच अडचण येणार नाही. शेख हमदान यांनी हा व्हिडीओ शेअर करत पोस्ट केली आहे की, “कधी-कधी आयुष्यात लहान गोष्टीही खूप मौल्यवान असतात” हे वाचा  -  धरतीपासून दूर आकाशात जन्मलं बाळ; आईने नाव ठेवलं SKY प्रिन्स शेख हमदान यांनी मानवतेचा एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. क्राऊन प्रिन्सच्या या निर्णयाचं कौतुक होतं आहे. गेल्या आठवड्यात क्राऊन प्राइस यांनी आपल्या कारच्या बोनटवरील पक्षिणीचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता आणि जोपर्यंत या अंड्यातून पिल्लं बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपण आपल्या कारचा वापर करणार नाही, असं म्हटलं होतं. हे वाचा  -  सॅल्युट! स्वतःचा ऑक्सिजन काढून डॉक्टरने 71 वर्षांच्या रुग्णाचे वाचवले प्राण शेख हमदान हे दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांचे दुसरे पुत्र. मोठा भाऊन असताना दुबईचे क्राऊन प्रिन्स झाले. शेख हमदान हे पर्यावरणप्रेमी आहेत. निसर्गाशी त्यांचं एक वेगळं नातं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात