मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पक्षी कसा उडतो पाहण्यासाठी पक्ष्यासोबतच आकाशात उडाली व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा VIDEO

पक्षी कसा उडतो पाहण्यासाठी पक्ष्यासोबतच आकाशात उडाली व्यक्ती; पुढे काय घडलं पाहा VIDEO

पक्ष्यासोबत आकाशात उंच उडाली व्यक्ती. कॅमेऱ्यात कैद झालं अद्भुत दृश्य.

पक्ष्यासोबत आकाशात उंच उडाली व्यक्ती. कॅमेऱ्यात कैद झालं अद्भुत दृश्य.

पक्ष्यासोबत आकाशात उंच उडाली व्यक्ती. कॅमेऱ्यात कैद झालं अद्भुत दृश्य.

  • Published by:  Priya Lad
ब्राझिलिया, 06 जून : पक्ष्याला आकाशात उडताना पाहून, मीसुद्धा पक्षी असतो तर... असा विचार एकदा तरी आपल्या मनात आलाच असेल. शाळेतही मी पक्षी असतो तर... किंवा मला पक्ष्यासारखं उडता आलं असतं तर... असे काल्पनिक निबंधही आपण लिहिले आहेत. पक्षी हवेत कसे उडतात असा प्रश्नही आपल्याला बऱ्याचदा पडतो. पक्षी कसा उडतो हे पाहण्यासाठी चक्क एका पक्ष्यासोबतच एक व्यक्ती आकाशात उंच उडाली (How birds fly). पुढे जे घडलं ते थक्क करणारं आहे (Man flying with black vulture video) . एका व्यक्तीने पक्ष्यासोबत आकाशात उंच भरारी घेतली. पक्ष्यासोबत ती आकाशात उडू लागली. आकाशात जितक्या उंचीवर पक्षी हवेत उडत होता. ही व्यक्तीसुद्धा तितक्याच उंचीवर गेली. हे अद्भुत असं दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. व्हिडीओ पाहून तुम्ही थक्क व्हाल. व्हिडीओत पाहू शकता एक भलामोठा पक्षी हवेत उडताना दिसत आहे. या पक्ष्यासोबत एक व्यक्ती कॅमेरा घेऊन हवेत उडते आहे. ही व्यक्ती पॅराशूटच्या मदतीने आकाशात उडते आहे. ही व्यक्ती पक्ष्यासोबत हजारो फूट उंचवर आहे. आकाशातून खाली जमिनीवर एकिकडे हिरवंगार जंगल आणि दुसरीकडे इमारती दिसत आहेत. हे वाचा - छोट्याशा उंदराने मांजरीला जीव नकोसा करून सोडलं; रिअल लाइफ Tom and Jerry Video एकदा पाहाच पक्ष्याला तुम्ही हवेत उडताना पाहिलं आहे पण तो ज्या पद्धतीने हवेत उडतो ते या व्हिडीओत तुम्हाला दिसून येईल. पक्षी आकाशात उडण्यासाठी एक टेक्निक वापरतो. पक्षी हवेत उडताना स्वतःला अॅडजस्ट करताना दिसतो. म्हणजे ज्या दिशेने उडायचं आहे, त्या दिशेला तो आपल्या शरीराचा मागील भाग फिरवताना दिसतो. कधी आपली शेपटी वर, कधी खाली, कधी उजवीकडे, कधी डावीकडे करतो. त्याचे पंख इतके मोठे आहेत की त्यात हवा आपोआप भरते आहे आणि हवा पंखात भरण्यासाठी त्याला पंख फडफडवण्याची गरजही पडत नाही.
उडता उडता का पक्षी ग्लाइडरवर येऊनही बसतो. तेव्हा ती व्यक्ती त्या पक्ष्यावरून हात फिरवते. हा पक्षी नेमका कोण आहे ते या पोस्टमध्ये सांगितलेलं नाही. पण तो गिधाडासारखा दिसतो आहे. हा पक्षी या व्यक्तीचा पाळीव पक्षी आहे असंच या व्हिडीओतून दिसतं. कारण तो या व्यक्तीसोबत अगदी बिनधास्त दिसतो आहे. तसंच त्याच्या पायात एक टॅगही बांधलेला आहे. हे वाचा - OMG! चक्क श्वानाने बनवले Cookies; विश्वास बसत नाही तर पाहा हा Chef Dog चा Video द ग्रेट प्लॅनेट इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे दृश्य ब्राझीलच्या सेरा डा एराटानातील आहे.
First published:

Tags: Viral, Viral videos

पुढील बातम्या