नवी दिल्ली, 11 एप्रिल : दारू प्यायल्यानंतर त्याच्या नशेत काय काय होतं ते तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. अशाच दारूच्या परिणामाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. एका तरुणाने दारू घेतली. त्याचा परिणाम असा की त्याच्या शरीरातून अचानक साप बाहेर आला. आता हा नेमका प्रकार काय ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल. एखाद्या लग्नातील किंवा कोणत्यातरी कार्यक्रमातील हा व्हिडीओ असावा असं दिसतं. ज्यात एक तरुण दिसतो आहे. शर्ट पँट घालून हा तरुण येतो. तरुणाला त्याचा तोल सावरत नाही आहे. त्याच्या शारीरिक हालचालीवरून आणि वागणुकीवरून तो दारू प्यायला आहे, हे दिसून येतं. मागे गाणं लागलं आहे आणि या गाण्यावर तो थिरकतो आहे. अचानक त्याच्या शरीरातून साप बाहेर येतो.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता नाचता नाचता हा तरुण जमिनीवर बसलेल्या श्वानाजवळ जातो. श्वानही त्या तरुणाला पाहून घाबरतो. तरुण त्या श्वानासमोर जाऊन डान्स करतो. …अन् बाईंचा सुटला ताबा; स्टेजवर येत शिक्षिकेचा विद्यार्थ्यांना ‘चुम्मा’; VIRAL झाला VIDEO तरुण त्या श्वानासमोर बसतो. श्वानाकडे पाहत हातवारे करतो. तरुणाला झालंय तरी काय, याचा विचार कदाचित हा श्वानही करतो आहे. त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात भीती, प्रश्न स्पष्टपणे दिसत आहेत. गाण्याचे शेवटचे बोल मै नागिण नागिण सुरू होतात आणि मग काय तरुणाचे दोन्ही हात डोक्याकडे जातात. हातांनी नागासारखा फणा काढतो आणि तो नाचू लागतो. हा तरुण नागिण डान्स करू लागतो. नागिण डान्सचे तसे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यापैकीच हा एक व्हिडीओ. नागिण डान्सचं हे वेगळं व्हर्जन. तरुणाच्या या अजब गजब डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. OMG! मांजरीच्या हातून हे काय घडलं? CCTV नसता तर सत्य समजलंच नसतं; Watch Video kafil_raaj नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला, या व्हिडीओवरील तुमची प्रतिक्रिया काय आहे, ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.