शक्ती सिंह (राजस्थान), 27 एप्रिल : तुमच्या घरात साप आल्यावर सगळेच घाबरून जाता. दरम्यान तो साप जर नाग असेल तर तुमच्या पायाखालची जमीनच हादरून जाते. अशीच एक घटना राजस्थानमधील कोटा येथे घडली आहे. केवल नगर भागात घरात तब्बल 5 फूट नाग आल्याने घरातील सगळेच घाबरल्याने मोठा गोंधळ झाला. परंतु सर्पमित्रांच्या सहाय्याने त्या नागाला बाहेर काढण्यात यश आले आहे. या नागाला बाहेर काढण्यासाठी तब्बल 1 तास प्रयत्न सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोटा शहरातील केवलनगर परिसरातील एका घरात बांधकाम सुरू होते.
यामुळे एका खोलीत संपूर्ण कुटुंब उदरनिर्वाह करत होते. त्याच खोलीत महिला जेवण करत असताना अचानक भला मोठा कोब्रा साप दिसला. यामुळे जेवण करणाऱ्या महिलांनी मोठी आरडाओरड केली.
5 मिनिटांत सुटेल बेवड्या नवऱ्याची दारू; हा घ्या सर्वात सोपा फॉर्म्युलायावर तातडीने घरच्यांनी सर्पमित्रांना फोन करून माहिती दिली. शहरापासून 15 ते 20 किलोमीटर दूर असलेला सर्पमीत्र तातडीने पोहोचला. तोपर्यंत घरातील सदस्य दहशतीत होते. शहरात पोहोचल्यानंतरच गोविंद शर्मा यांनी सावधपणे कोब्रा पकडला आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती दिली. सुदैवाने सापामुळे कोणतीही जिवीतहाणी झाली नाही.
यावेळी सर्पमीत्र गोविंद म्हणाले की, घरात आलेला साप हा कोब्रा जातीचा होता. यावेळी उपस्थित असलेल्या कुटुंबातील एका व्यक्तीने मला फोन करून याबाबत माहिती दिली. अत्यंत चपळाईने या सापाला आम्हाला पकडण्यात यश आलं आहे. त्यानंतर त्याला जंगलात सोडून दिले आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती दिली.
लग्नातील स्टेजवरच सुटला नवरदेवाचा पायजमा, समारंभात एकच हशा, पाहा Videoयावेळी सर्पमित्रा गोविंद म्हणाले की, तुम्हाला कोणताही साप दिसला तर त्याला मारू नका, तुम्ही जोपर्यंत त्यांच्यावर हल्ला करणार नाही तोपर्यंत साप काहीही करणार नाही. ज्यावेळी तुम्ही सापाला मारायला जाल त्यावेळी तो तुमच्यावर हल्ला करेल. यामुळे सापाला न मारता सर्पमित्रांना फोन करून सापांना जिवदान देण्याचे आवाहन केले.