मुंबई, 19 जुलै : वाघ (Tiger) म्हटलं तरी अंगाला घाम फुटतो, शरीर थरथर कापायला लागतं, तोंडातून एक शब्दही बाहेर पडत नाही. अशात तुमच्यासमोर एखादा वाघ (Tiger video) अचानक आला तर तुमचं काय होईल. वाघाची भीती प्रत्येकाला वाटते. वाघासमोर काय वाघापासून अगदी काही अंतर दूरही कुणी उभं राहण्याची हिंमत करणार नाही. पण एका व्यक्तीने तर चक्क अशा वाघाशी मैत्री (Man said hello brother to tiger) करण्याचा प्रयत्न केला आहे. वाघाशी मैत्री करण्याचा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतो आहे. वाघाला समोर पाहताच ही व्यक्ती घाबरली तर नाहीच. उलट त्याच्या समोर उभं राहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.
ग़ज़ब का दुस्साहस है।
— Kamal khan (@kamalkhan_NDTV) July 19, 2021
एक शख्स एक आदमखोर टाइगर के सामने जाके कहता है, "हैलो ब्रदर !"
लखीमपुर में इंडो-नेपाल बॉर्डर के तिकोनिया के जंगल के पास यह टाइगर चार लोगों को खा चुका है। pic.twitter.com/FtdZ768Pjz
व्हिडीओत पाहू शकता एका झाडांच्या मध्ये वाघ दिसतो आहे. त्याच्या समोर काही लोक आहेत, जे या वाघाला आपल्या कॅमेऱ्यात टिपत आहेत.त्याचवेळी एका वाघाची नजर या लोकांकडे जाते. तो त्यांच्याकडे टकमक पाहतच असतो. वाघ आपल्याकडे पाहत असल्याचं समजताच एक व्यक्ती वाघाला चक्क हेलो ब्रदर असं म्हणून हाक मारते. वाघ त्या व्यक्तीकडे पाहतच राहतो. वाघ ज्या नजरेने त्या व्यक्तीकडे एकटक पाहतो, ते पाहूनच हृदयात धडकी भरते. हे वाचा - OMG! 4 सीटर कारमधून निघाले इतके प्रवासी, मोजता मोजता पोलिसांची दमछाक; पाहा VIDEO कमल खान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टनुसार हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितलं जातं आहे. लखीमपूर खिरी जिल्ह्यातील हे दृश्य आहे. भारत-नेपाळा सीमेवरील तिकोनिया जंगलातील मझरा पूरब स्टेशनजवळ एक वाघ नेहमी फिरताना दिसतो. या वाघाने आतापर्यंत चार जणांना आपलं भक्ष्य बनवलं आहे. सुदैवाने ही व्यक्ती मात्र बचावली आहे. त्याला वाघाने कोणतीही हानी पोहोचवली नाही. हे वाचा - VIDEO: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा अस्वलाचा महिलेवर हल्ला; पाहा कशी झाली अवस्था वनविभागही या वाघाच्या शोधात आहे. पण अद्याप त्याच्यापर्यंत कुणीही पोहोचू शकलं नाही. आता तर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस या व्यक्तीच्याही शोधात आहे. ज्याने या वाघाला हेलो ब्रदर असं म्हटलं आहे.