मुंबई, 19 जुलै : एखाद्या कारमध्ये
(Car) फार फार तर किती लोक बसू शकतात. ड्रायव्हर पकडून चार, सहा, आठ. पण सध्या सोशल मीडियावर
(Social media) अशा कारचा व्हिडीओ व्हायरल
(Viral video) होतो आहे. ज्यातील प्रवासी मोजता मोजता
(Car loaded with Passengers) पोलिसांची दमछाक झाली. हा व्हिडीओ पाहून तर तुम्हीसुद्धा हौराण व्हाल.
छोट्याशा कारमध्ये जास्तीत जास्त प्रवासी कसे बसवायचे याचा जुगाड कसा केला आहे, तो तुम्हाला या व्हिडीओत दिसून येईल. व्हिडीओत पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचं हसू बिलकुल आवरणार नाही. हा जुगाड पाहून पोलीसही शॉक झाले.
सुरुवातीला एक तरुण एका छोट्या मुलीसह या गाडीतून बाहेर पडतो. त्यानंतर एकामागोमाग एक असे 8 जण बाहेर पडतात. आता तरी गाडीतील प्रवासी संपले असं वाटतं. पण नाही तिथूनच आणखी दोन जण बाहेर पडतात. गाडीच्या मागच्या सीटवरून असे एकूण 12 जण बाहेर पडतात. त्यानंतर गाडीच्या पुढील सीटवर बसलेला एक ड्रायव्हरही बाहेर येतो.
हे वाचा - VIDEO : रेल्वेखाली करीत होता दुरुस्ती, हॉर्न वाजला..आणि अचानक सुरू झाली ट्रेन
आता तरी गाडी रिकामी झालं असं वाटेल. पण नाही गाडी पूर्णपणे रिकामी झाली नाही. या गाडीत आणखी प्रवासी आहेत. आता तर गाडीत कुणीच दिसत नाही मग प्रवासी कुठे आहेत, असाच प्रश्न तुम्हाला बसेल. इतर प्रवासी हे गाडीच्या मागच्या बाजूला डिक्कीत आहेत. इथे तुम्ही मोजाल तर एकूण चार जण इथून बाहेर पडता. त्यातच त्यांच्यासोबत सर्वांचं सामानही तिथंच ठेवलं आहे. म्हणजे या 4 सीटर एवढ्याशा गाडीतून तब्बल 16 प्रवासी बाहेर पडले. म्हणजे गाडीच्याप्रवासी क्षमतेपेक्षा चारपट जास्त प्रवासी या गाडीत होते.
हे वाचा - VIDEO: मास्कशिवाय ट्रेनमध्ये चढणाऱ्याला तरुणींनी घडवली अद्दल; आधी धक्का, मग....
जाट एंटरटेन्मेंट फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.