मुंबई, 09 डिसेंबर : वाघ, सिंह, चित्ता, बिबट्या असे जंगली प्राणी आपल्याला जंगल, नॅशनल पार्क किंवा प्राणीसंग्रहायलयातच पाहायला मिळतात. सहसा त्यांचं दर्शन होणं म्हणजे दुर्मिळच. त्यामुळे असे प्राणी (Animal video) समोर दिसताच भीती वाटतेच पण त्यासोबतच त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा मोहही आवरत नाही. अशाच एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, ज्याने चक्क सिंहांसमोर (Lion video) जाऊन जमिनीवर झोपून त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. प्राण्यांचे फोटो आणि व्हिडीओ करण्याची आवड असणारे काही लोक याचं रितसर प्रशिक्षण घेतात. त्यांना वाइल्डलाइफ फोटोग्राफरही म्हटलं जातं. जे अशा जंगलातील प्राण्यांचे फोटो आणि व्हिडीओ शूट करतात आणि त्यांचं आयुष्य जगासमोर आणतात. अशाच फोटोग्राफरही हा एक फोटोग्राफर असावा ज्याने अशी भलतीच डेअरिंग केली आणि ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहूनच आपल्याला धडकी भरते.
@wildlifewalk इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओत पाहू शकता एका जंगलात एक तरुण जमिनीवर पोटावर झोपला आहे. त्याच्या हातात कॅमेरा आहे. इतक्यात समोरून जंगलाचा राजा सिंह येतो. त्याच्यामागोमाग दोन सिंहिणी येतात. सिंहाचं कुटुंब त्या रस्त्यावरून जात असतं. हे वाचा - ट्रेनपेक्षाही तेज! कुत्र्याचा वेग पाहून तुम्हीही तोंडात बोटं घालाल; पाहा VIDEO सिंह दिसताच तरुण त्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा प्रयत्न करतो. सिंहांचा कळप त्याच्या इतक्या जवळ आहे, तरी तो तिथून हटला नाही. तसाच पडून राहिला. त्याचं नशीब बलवत्तर म्हणा सिंहांनी त्याला काहीच केलं नाही. ते गप्पपणे तिथून आपल्या मार्गाने निघून गेले आणि तरुण जमिनीवरून उठून कॅमेऱ्याकडे पाहून हसू लागला. पण हा व्हिडीओ पाहताना आपल्याला मात्र नक्कीच घाम फुटतो. अशी फोटोग्राफी करणं या तरुणाच्या जीवावर बेतू शकलं असतं. सिंहांनी ठरवलं असतं तर काही क्षणात हा तरुण त्यांची शिकार झाला असता. हे वाचा - निसर्गरम्य ठिकाणी फोटो काढायला आवडतं? मग या तरुणीसोबत घडलेली घटना बघाच, VIDEO हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स धक्क झाले आहेत. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी याला तरुणाचं धाडस म्हटलं आहे तर काही जणांनी याला मूर्खपणा म्हटलं आहे. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून नेमकं काय वाटतं हे आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.