जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 'सर लोन पाहिजे का?' असं विचारताच, व्यक्तीनं मागितली अशी गोष्ट ऐकून थेट कोमात गेली तरुणी

'सर लोन पाहिजे का?' असं विचारताच, व्यक्तीनं मागितली अशी गोष्ट ऐकून थेट कोमात गेली तरुणी

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

वेळोवेळी येणाऱ्या या कॉल्समुळे अनेक वेळा माणूस अस्वस्थ होतो. अशा वेळी लोक कधीकधी समोरच्या व्यक्तीला काहीही बोलतात. असंच एका व्यक्तीनं केलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जुलै : तुम्हाला दिवसभरात दोन ते चार फोन प्रोडक्ट विकणाऱ्या लोकांचे येतच असणार. शिवाय कर्जासाठी किंवा क्रेडिटकार्डसाठी देखील तुम्हाला अनेक फोन येत असतील. वेळोवेळी येणाऱ्या या कॉल्समुळे अनेक वेळा माणूस अस्वस्थ होतो. अशा वेळी लोक कधीकधी समोरच्या व्यक्तीला काहीही बोलतात. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला होता, ज्यानंतर त्याने असा काही रिप्लाय दिला की त्याचा ऑडिओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. सहसा, आपण मोकळे असताना असे कॉल उचलतो, पण जर आपण काही कामात व्यस्त असतो आणि या असे फोन येऊ लागतात तेव्हा मात्र सर्वच त्रासदायक होऊ लागतं, एका माणसाला असाच राग आला आणि तो समोरील व्यक्तीसोबत विचित्र वागला. हे ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकून तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाही. पावसाळ्यात घरात माश्या का येतात? यामागे आहेत 5 महत्वाची कारणं व्हायरल होत असलेल्या ऑडिओ कॉलमध्ये स्पष्टपणे ऐकू येत आहे की कर्ज ऑफरबद्दल सांगण्यासाठी एका व्यक्तीला बँकेकडून कॉल येतो. यावर ती व्यक्ती म्हणते की त्याला कर्ज घ्यायचे आहे. यावर एजंट त्याला विचारतो- कर्ज किती असेल? त्या व्यक्तीने त्याच्या उत्तरात सांगितले की, त्याला 300 कोटींचे कर्ज हवे आहे. तेव्हा लोनसाठी फोन केलेल्या मुलीला धक्का बसला, ज्यामुळे ती त्या व्यक्तीला यामागचं कारण विचारते की त्याला हे कर्ज कशाला हवे आहे? यानंतर ती व्यक्ती सांगते – ‘मला ट्रेन घेण्यासाठी कर्ज घ्यावे लागेल.’ यावेळी ती मुलगी घाबरते. मग मुलगी पुढे विचारते - सर, तुमचे या आधीचे काही कर्ज आहे का? त्याच्यावर ती व्यक्ती म्हणते की हो सायकलसाठी 1600चं कर्ज आहे, तेव्हा त्या मुलीला आणखीच धक्का बसतो. नदीत मगरीसोबत खेळत होता तरुण, पाय बोटीबाहेर सोडून बसला खरा पण… पाहा Viral Video हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर dumbest_man1811 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 15 जुलै रोजी शेअर करण्यात आला होता. ज्याला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. लोक या ऑडियोचा मस्त आनंद घेत आहेत. एका युजरने मजेदारपद्धतीनं म्हटलं की, “तरुणी थेट कोमातच पोहोचली असावी.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात