जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - हत्तीने किक मारताच चवताळली म्हैस; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही

VIDEO - हत्तीने किक मारताच चवताळली म्हैस; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही

VIDEO - हत्तीने किक मारताच चवताळली म्हैस; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही

हत्ती आणि म्हैस दोघंही आमनेसामने आले आणि…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 08 मार्च : हत्ती आणि म्हैस तसे दोघंही शरीराने मोठे प्राणी. पण दोघांमध्ये तुलना करता हत्ती त्यांच्यात अवाढव्य प्राणी. असे हे प्राणी एकमेकांसमोर आले आणि त्यांनी एकमेकांशी पंगा घेतला तर काय होईल, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?. हत्ती आणि म्हशीचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये असं काही घडलं जे पाहून तुम्हाला त्यावर विश्वास बसणार नाही. हत्ती तसा शांत प्राणी पण तितकाच तो मस्तीखोरही असतो. छोट्याशा हत्तींचे मजामस्ती करताना असे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. आता तर हत्तीने थेट म्हशीसोबत मस्ती केली. मजेमजेत त्याने शांत बसलेल्या म्हशीला किक मारली आणि त्यानंतर काय म्हैस संतप्त झाली. चवताळलेली म्हैस हत्तीवर धावून गेली आणि तिने त्याच्यावर हल्ला केला. हे वाचा -  ‘मैं झुकेगा नहीं’, जन्मताच बाळाचा Pushpa Swag; आतापर्यंतचा सर्वात Cutest Video व्हिडीओत पाहू सकता हत्ती आणि म्हशींचा कळप दिसतो आहे. एक म्हैस शांत बसलेली आहे, तिच्याजवळ एक हत्ती चालत येतो. तो हळूच त्या म्हशीला आपल्या पुढच्या एका पायाने किक मारतो. हा हत्ती म्हशीवर हल्ला करण्याच्या उद्देशाने नव्हे तर मजेमजेत मारतो हे आपल्याला या व्हिडीओतून स्पष्ट होतो. म्हशीला मारताच तो गुपचूप मागे फिरतो आणि तिथून निघून जातो.

जाहिरात

पण म्हैस मात्र इतकी संतप्त होते की तिथून उठते आणि त्या हत्तीच्या पाठीमागे धावत जाते. त्याला पार्श्वभागावर आपल्या शिंगांनी मारते. पण तिच्या हल्ल्यानंतरही हत्तीला काहीच वाटत नाही. तो तसाच राहतो. तिच्यावर मागे फिरून पुन्हा हल्ला करताना दिसत नाही. हत्तीने खरंतर शांत बसलेल्या म्हशीला चिथवण्याच्या दृष्टीनेच तिला मजेमजेत मारलं. म्हणून तो तिच्या हल्ल्याचा पुन्हा प्रतिकार करत नाही. हे वाचा -  भारीच! पाण्याच्या ड्रमपासूनच तयार केला Desi Ac; हा Video तुम्ही पाहायलाच हवा animals.energy नावाच्या इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात