मुंबई, 10 मार्च : मगरीच्या शिकारीचे बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. मगर इतक्या हुशारीने शिकार करते की पहिल्याच फटक्यात ती आपला निशाणा साधते. तिच्या तावडीतून सुटणं भल्याभल्या प्राण्यांनाही शक्य होत नाही. पण माकडांसमोर मात्र मगरीचं काहीच चाललं नाही. माकडांवर हल्ला करणं मगरीला चांगलंच भारी पडलं. शिकारीसाठी आलेल्या मगरीवर माकडं तुटून पडली आणि तिची इतकी भयंकर अवस्था केली की आता ती मगर यापुढे चुकूनही पुन्हा माकडांशी पंगा घेणार नाही (Crocodile monkey Fight video). मगर आणि माकडाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यात मगर ज्याची शिकार करायला गेली त्याचाच तावडीतून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडताना दिसली. माकडांनी तिच्यावर इतका खतरनाक हल्ला केला की शिकार सोडा मगर भीतीने मैदान सोडून पुन्हा पाण्यात गेली. व्हिडीओत पाहू शकता काही माकडं एका तलावाजवळ पाणी प्यायला जातात. या पाण्यात खतरनाक मगर आहे, याची पुसटशी कल्पना त्यांना नव्हती. हे वाचा - VIDEO-हत्तीने किक मारताच चवताळली म्हैस; पुढे जे घडलं ते पाहून विश्वास बसणार नाही एक माकड पाण्याच्या आत जातं आणि तिथं एका दगडावर बसतं. पण ज्या दगडावर ते बसलेलं असतं तो दगड नव्हता तर एक भलीमोठी मगर होती. मगर हळूच पाण्यातून बाहेर येत आपल्या पाठीवर बसलेल्या माकडाला आपली शिकार करायला जाते. त्यावेळी इतक माकडांना तिच्या पाठीवर बसलेलं माकड पाण्यात जाताना दिसतं आणि त्याच्याकडे लक्ष जाताच त्यांना ती मगरही दिसते.
الفزعة 🐵💪🏻 pic.twitter.com/v33NgVn4H4
— إفتراس | prey (@iftirass) March 6, 2022
आता मगर म्हटली की कुणीही आपला जीव वाचवण्यासाठी पळालं असतं. पण या माकडांनी तसं बिलकुल केलं नाही. उलट दूर दूर बसलेले हे माकड मगरीच्या दिशेने धावत आले. सर्वानी मिळून त्यांनी मगरीवर हल्ला केला. मगरीच्या तावडीतून त्या माकडाला सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्वांनी मिळून मगरीला चांगलीच अद्दल घडवली. माकडांच्या एकीच्या बळासमोर तिच्या ताकदीचं काहीच चाललं नाही. मगरीची चाल माकडांसमोर उलटी पडली. हे वाचा - हा कसला छंद? या इसमाने 120 विषारी कोळी पाळून त्यांना दिली आहे खास बेडरुम @iftirass नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत. मगरीशी दोनहात करणाऱ्या माकडांचं सर्वांनी कौतुक केलं आहे.