नवी दिल्ली 14 मार्च : जगात अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्यांच्याबद्दल आपण कल्पनाही केलेली नसते (Weird Things About World). त्यामुळे अशा काही गोष्टी समोर आल्या की आपल्याला ते अतिशय विशेष वाटतं. अजूनही आपल्याला या जगातील सगळ्याच गोष्टी माहिती आहेत असं नाही. दररोज जगातील अनेक नवनवीन गोष्टी आपल्यासमोर येत असतात. वेल्समधल्या एका व्यक्तीसोबतही असंच घडलं, जेव्हा त्याला आकाशातून एक चमकणारा दगड कोसळताना दिसला. हा दगड शोधण्यासाठी त्याने जवळपास एक वर्ष घालवलं. मात्र जेव्हा हा दगड त्याला सापडला, तेव्हा त्याची किंमत ऐकून हा व्यक्ती थक्क झाला (Price of Wales Meteorite). कधी ‘गुलाबी चहा’ ट्राय केलाय का? चहाप्रेमींनो हा VIDEO एकदा नक्की बघा द सन वेबसाईटच्या वृत्तानुसार, नॉर्थ वेल्सच्या व्रॅक्सहॅममध्ये राहणाऱ्या 38 वर्षाचा टोनी व्हिल्डिंग (Tony Whilding) आपल्या घराच्या अंगणात सिगरेट पित होता. इतक्यात अचानक त्याला आकाशात काहीतरी उडणारी वस्तू दिसली. त्याने सांगितलं की आकाशात अगदी तीव्र प्रकाश दिसला. त्याला दिसलं की आगीने वेढलेला एक दगड जमिनीच्या दिशेने येत आहे. हा दगड जमिनीच्या अगदी जवळ येत होता आणि त्याच्या आजूबाजूला भरपूर धूरही होता. त्याने सांगितलं की जसजसा हा दगड त्याच्या घराच्या दिशेने येत होता, तसा तो आणखीच जास्त चमकत होता. मात्र अचानक हा दगड गायब झाला आणि वरती फक्त धूर दिसू लागला. टोनीला याचा अंदाज आला होता, की हे एर उल्कापिंड आहे. त्यामुळे तो तेव्हापासूनच याचा शोध घेत होता. Shocking! उंच डोंगरावर उभा राहून घेतली उडी; तरुणाचा VIDEO पाहून संतापले नेटकरी टोनीने आसपासच्या शेतांमध्ये हा दगड शोधण्यास सुरुवात केली आणि जवळपास 18 महिन्यानंतर त्याला तो दगड एका शेतात आढळला. नॉर्थ वेल्स लाईव्ह वेबसाईटच्या वृत्तानुसार, हा दगड सापडल्यानंतर त्याने त्याच्यावर रिसर्च केला आणि अनेक जाणकारांचा सल्ला मागितला. सर्वांनी हेच सांगितलं की हा दगड उल्कापिंड वाटत आहे. हा दगड जरा खरंच उल्कापिंड निघाला तर त्याची किंमत 1 कोटीहूनही अधिक असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.