जाहिरात
मराठी बातम्या / Viral / पाहुणे डान्समध्ये तर नवरदेव लग्नाच्या विधींमध्ये होता मग्न..तेव्हाच प्रियकरासोबत फरार झाली नवरी, मग हाय व्होलटेज ड्रामा

पाहुणे डान्समध्ये तर नवरदेव लग्नाच्या विधींमध्ये होता मग्न..तेव्हाच प्रियकरासोबत फरार झाली नवरी, मग हाय व्होलटेज ड्रामा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

घंही दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नवरीकडील लोक या लग्नासाठी तयार नव्हते. याच कारणामुळे या जोडप्याने हे पाऊल उचललं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पाटणा 16 मार्च : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण असतो. मात्र अनेकदा मंडपातच अशा काही घटना घडतात, ज्यामुळे क्षणात हा आनंद दुःखात बदलतो. अशीच एक घटना आता बिहारच्या जमुईमधून समोर आली आहे. यात सात फेरे घेण्याआधीच नवरी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली. वरात दरवाजावर आलेली होती. नवरदेव आणि नवरी दोन्हीकडील पाहुणे या सोहळ्याच्या आनंदात मग्न होते. तेव्हाच नवरीने चेहरा धुवायला जात असल्याचं सांगितलं आणि बाहेर वाट बघत असलेल्या प्रियकरासोबत फरार झाली. पुरुषच नाही तर इथे महिलाही फिरतात विनाकपड्यात दोघंही दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र नवरीकडील लोक या लग्नासाठी तयार नव्हते. याच कारणामुळे या जोडप्याने हे पाऊल उचललं. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. वधू फरार झाल्याची माहिती वराला समजताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. झारखंडहून आलेल्या वरातीला निराश होऊन परतावं लागलं. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी प्रियकराच्या आईला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं. लवकरच दोघांनाही पकडलं जाईल, असं पोलिसांचं म्हणणं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लग्न 13 मार्च रोजी होणार होतं. मात्र काही कारणास्तव तारीख बदलून 14 मार्च करण्यात आली. लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. रात्री 11 च्या सुमारास झारखंडमधील देवघर येथून ही वरात जासीडीह पोलीस स्टेशन हद्दीतील संथाली गावात पोहोचली. दोन्ही कुटुंबात उत्साहाचं वातावरण होतं. डीजेवर वरातीतील लोक जोरदार नाचत होते आणि वरातीतील पाहुण्यांच्या स्वागतासाठी वधू पक्ष सज्ज झाला होता.

News18लोकमत
News18लोकमत

यादरम्यान अचानक मुलीच्या बाजूकडील लोकांना समजलं की, नातेसंबंधाने भाऊच लागणारा अरविंद यादव त्यांच्या मुलीला घेऊन पळून गेला आहे. नातेवाईकांनी वधूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र ती कुठेच सापडली नाही. या प्रेमप्रकरणावरून दोन्ही कुटुंबात वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचलं होतं, मात्र परस्पर संमतीने प्रकरण मागे घेण्यात आलं. पण लग्नाच्या दिवशी दोघंही फरार होतील याची कोणालाच कल्पना नव्हती. या घटनेनंतर गावातील लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride , wedding
  • First Published :
जाहिरात
जाहिरात