जाहिरात
मराठी बातम्या / Viral / तरुणाने स्वतःच स्वतःला पेटवलं आणि...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

तरुणाने स्वतःच स्वतःला पेटवलं आणि...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

तरुणाने स्वतःच स्वतःला पेटवलं आणि...; VIDEO पाहून अंगावर काटा येईल

प्रसिद्धीसाठी तरुणाचा आगीशी खतरनाक खेळ, व्हिडीओ होतोय व्हायरल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 21 मार्च : आगीच्या खेळाचे बरेच व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील (Fire stunt video). कुणी हातात आगीच्या काठ्या घेऊन नाचवतं, कुणी त्यावर तोंडाने फुंकर मारतं, कुणी आगीच्या रिंगमधून उडी मारते. आगीसोबत असे खतरनाक स्टंट अनेकदा जीवावर बेतात. एका तरुणाचा आगीशी खेळाचा असाच भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Man stunt with fire video). एका तरुणाने स्वतःच्या शरीराला आग लावली. व्हिडीओ पाहूनच अक्षरशः अंगावर काटा येतो. पेटलेल्या शरीरासोबतच हा तरुण जीवघेणा स्टंट करताना दिसते. धडकी भरवणारा असा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत पाहू शकता ही व्यक्ती एका पुलावर चालताना दिसते आहे. तिने आपल्या शीरार आग लावली आहे. सुरुवातीला पुलावरून ही व्यक्ती चालते आणि अचानक नदीत उडी मारते. हे वाचा -  विनाहेल्मेट BIKE STUNT करताना तोल गेला आणि…; VIDEO पाहून भरेल धडकी ब्लॅक फ्लिप करत ती पाण्यात जाते. पाण्यात जाताच आग विझते. ज्यामुळे त्याला कोणती दुखापत होत नाही.

जाहिरात

काही दिवसांपूर्वीच आगीशी खेळणाऱ्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात एका तरुणाने कॅमेऱ्यासमोर येत पाठीला आग लावली. रिल्ससाठी या व्यक्तीने जोशात स्वतःच स्वतःच्या पाठीला आग लावली. व्हिडीओत पाहू शकता व्यक्ती कॅमेऱ्याकडे पाठ करून उभू राहते. आपल्या हातात लाइटर घेते आणि तो हात मागे करून स्वतःच्याच हाताने लायटर पेटवून आपल्या पाठीला आग लावते.

व्यक्तीला वाटलं की यामुळे फार काही होणार नाही. छोटीमोठी आग पेटेल पण आपल्याला काही दुखापत होणार नाही, असं समजून तो बिनधास्त होता. पण जसं तो लाइटर पेटवतो तशी आग पेटते आणि मग आपला जीव वाचवण्यासाठी अंगावरील जॅकेट काढून ही व्यक्ती बाथरूमच्या दिशेने आग विझवण्यासाठी ओरडत पळत सुटते. हे वाचा -  OMG! खेळता खेळता अचानक हवेत उडाला तरुण आणि…; काय घडलं पाहा VIDEO स्वतःच्या शरीरावर आग लावून स्टंट करणारे बरेच स्टंटमॅन तुम्ही पाहिले असतील. ते सुरक्षेची काळजी घेत, सुरक्षा उपकरणांचा वापर करत असे स्टंट करतात. त्यामुळे तुम्ही असे स्टंट करू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात