मराठी बातम्या /बातम्या /Viral /

विनाहेल्मेट एका चाकावर ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि...; BIKE STUNT VIDEO पाहून भरेल धडकी

विनाहेल्मेट एका चाकावर ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि...; BIKE STUNT VIDEO पाहून भरेल धडकी

एका चाकावर बाईक स्टंट करणं तरुणाला पडलं महागात.

एका चाकावर बाईक स्टंट करणं तरुणाला पडलं महागात.

एका चाकावर बाईक स्टंट करणं तरुणाला पडलं महागात.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 20 मार्च : प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय काय नाही करत. विशेषतः तरुण त्यांच्या हातात बाईक असेल तर त्या बाईकवर आपली हीरोगिरी दाखवण्याची एक संधी सोडत नाही. खतरनाक बाईक स्टंट करत सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करतात. पण काही वेळा हे स्टंट फेल होतात आणि मोठी दुर्घटना घडते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Bike stunt video).

एक तरुण एका चाकावर बाईक स्टंट करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याच क्षणी त्याच्यासोबत असं काही घडतं की तो यानंतर कदाचित पुन्हा असा बाईक स्टंट करण्याचा विचारही करणार नाही. व्हिडीओ पाहून तुम्हाला धडकी भरेल. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या बाईक स्टंटचं हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

हे वाचा - तरुणीसमोर हिरोपंती करायला गेला अन् झाली भलतीच फजिती; हा VIDEO पाहून पोट धरून हसा

व्हिडीओत पाहू शकता तरुण बाईकवर आहे. तो बाईकचं पुढचं चाक वर करतो आणि मागील एका चाकावर बाईक बॅलेन्स करत चालवायला जातो. त्यावेळी त्याचं नियंत्रण सुटतं. सुरुवातीला तो बाईकवरून पडतो पण बाईकचं हँडल सोडत नाही. बाईक त्याला फरफटत नेते अखेर कसंबसं करून तो पुन्हा बाईकवर चढतो.

पण बाईकवर तो आडवा राहतो आणि बाईक इतकी वेगात आहे की तो आपोआप चालतो.  तरुणाने हेल्मेटही घातलं नाही आहे. त्यामुळे त्याचा जीव जाण्याचाही धोका होता. त्यामुळे असा बाईक स्टंट करण्याची हिंमत तुम्ही बिलकुल करू नका.

हे वाचा - रहदारीच्या रस्त्यावर चालत्या गाडीत केली चोरी; VIDEO पाहून चक्रावून जाल

asikin_ali_07_g_k नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहे. कुणीला याला असली हेव्ही बाईकर म्हटलं आहे, तर कुणी त्याचा बॅलेन्सचं कौतुक केलं आहे. एका युझरने याला बॅलेन्स नाही नशीब म्हणतात, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

First published:

Tags: Bike riding, Stunt video, Viral, Viral videos