नवी दिल्ली 24 जून : सोशल मीडियावर रिल्स बनवून अन् व्हिडिओ पोस्ट करून अनेकांची आयुष्यच बदलली आहेत.. आज असे लोक लाखो, करोडो रुपये कमवत आहेत. मात्र अनेकदा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात लोक स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाहीत.. अनेकवेळा अशा घटनाही समोर आल्या आहेत, ज्यात व्हिडिओ बनवत असताना झालेल्या चुकीमुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे. लोक रेल्वे ट्रॅक, समुद्र, धावती ट्रेन, सुसाट बाईक तसंच कारवरही स्टंट व्हिडिओ शूट करताना दिसतात. मात्र परंतु अनेकदा त्याचे गंभीर परिणाम या लोकांना भोगावे लागतात. अर्रर्रर्र! लग्नात हिरोपंती करायला गेला, पण तरुणावर तोंड लपवण्याची वेळ; असं काय घडलं पाहा VIRAL VIDEO आजच्या युगाला सोशल मीडियाचं युग म्हटल्यास वावगं ठरणार नाही. इथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी माणूस काहीही करायला तयार असतो. अनेक जण तर जीव धोक्यात घालतात. विशेषत: तरुणांमध्ये ही क्रेझ जास्त प्रमाणात दिसून येते. हे लोक अनेकदा चित्रपट पाहून प्रभावित होतात आणि काहीही विचार न करता स्टंट करायला जातात. असाच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ज्यात एक व्यक्ती एका खोल खड्ड्याच्या जवळ उभा राहून स्टंट करताना दिसला, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे घडलं ते हैराण करणारं होतं.
— Out of Context Human Race (@NoContextHumans) June 21, 2023
व्हायरल होत असलेल्या या धक्कादायाक व्हिडिओमध्ये एक व्यक्ती खोल दरीच्या काठावर उभा असल्याचं दिसत आहे. जिथे माणसाला उभा राहायलाही भीती वाटेल, तिथे हा व्यक्ती स्टंट करण्याच्या तयारीत आहे. आजूबाजूला लोक उभा राहून बघत असल्याचं दिसताच तो खूप प्रेरित होतो आणि लगेचच स्टंट करण्यासाठी बॅकफ्लिप मारतो. पण एका चुकीमुळे तो थेट खड्ड्यात पडतो. व्हिडिओमध्ये दिसतं, की ज्या पद्धतीने तो पडला, ते पाहता त्याला किती दुखापत झाली असेल. @NoContextHumans नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. बातमी देईपर्यंत 43 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, ‘नक्कीच त्या व्यक्तीची मान मोडली असणार.’ दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘पहाडावर जाताच लोकांना काय होतं ते कळत नाही, ते अशी कृत्य का करू लागतात.’ आणखी एका युजरने लिहिलं, भाऊ, इथे स्टंट करायला कोणी सांगितलं होतं.’ याशिवाय इतरही अनेक यूजर्सनी यावर कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.