मुंबई, 23 जून : सोशल मीडियावर लग्नाचे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच एका लग्नाच्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पण हे लग्न नवरा-नवरीमुळे किंवा त्यांच्या कुटुंबामुळे नव्हे तर एका तरुणामुळे चर्चेत आलं आहे. कारणही तसंच आहे. लग्नात हा तरुण हिरोगिरी करायला गेला पण तिच त्याला महागात पडली. नवरा-नवरी आणि लग्नात आलेल्या सर्वांसमोर तो असं काही करायला गेला की भलतंच काहीतरी घडलं. शेवटी तरुणावर तोंड लपवण्याची वेळ आली आहे. लग्नात सर्व विधी झाल्यानंतर नवरा-नवरीला शुभेच्छा, गिफ्ट दिले जातात. हा तरुणही अशाच शुभेच्छा-गिफ्ट देण्यासाठी स्टेजवर आला. पण त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं. सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचून घ्यायचं होतं आणि नवरा-नवरीला इम्प्रेस करायचं होतं. या नादात त्याने नको तेच केलं आणि नको तेच घडलं. तरुण करायला गेला एक पण घडलं भलतंच. प्रयत्न तो करत होता. त्यासाठी स्टेजवर जाऊन त्याने वरवधूसमोर हिरोगिरी केली पण ही हिरोगिरी त्याला महागात पडली. Wedding Video Viral : वरात दारात येताच उत्साही नवरी धावत बाल्कनीत गेली; पुढे असं काही घडलं की… व्हिडीओत तुम्ही पाहू शकता स्टेजवर नवरा-नवरीसमोर हा तरुण दिसतो आहे. त्याचं तोंड नवरा-नवरीकडे आणि पाठ पाहुण्यांकडे आहे. थोडं मागे पाहतो आणि त्यानंतर तो फ्लिप मारतो. पण पुढे असं काही घडतं की तरुणाने विचारही केला नसेल. जसा तो बॅकफ्लिप मारतो तसा त्याचा तोल थोडा ढासळतो आणि तो स्टेजवर तोंडावर आपटतो. त्याला अशा पद्धतीने पडलेलं पाहून नवरीही शॉक होते. त्यानंतर तरुण नवरदेवासमोर गुडघ्यावर बसून त्याला गिफ्ट देतो. त्यानंतर उठतो तो तोंड लपवतच. काही क्षणापूर्वी अगदी छाती ताणून हिरोगिरी करणाऱ्या या तरुणाची चांगलीच फजिती होते. त्यानंतर मात्र त्याला तोंड दाखवायचीही लाज वाटते, असंच त्याच्या वागणुकीवरून दिसत आहे. Weird Tradition : इथं लग्नाआधी नवरदेव नवरीसाठी खरेदी करतो इनरविअर आणि लग्नातच… हा @memecentral.teb नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून त्यायवर बऱ्याच कमेंट येत आहेत.
तुमची या व्हिडीओवरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.