जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral Video: झोक्यावर उभा राहून स्टंट करत होता; व्यक्तीसोबत घडलं अतिशय भयानक

Viral Video: झोक्यावर उभा राहून स्टंट करत होता; व्यक्तीसोबत घडलं अतिशय भयानक

स्टंट करताना झुल्यावरुन कोसळला

स्टंट करताना झुल्यावरुन कोसळला

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती झुल्यावरून खाली पडतो आणि त्यानंतर त्याच झुल्याच्या दुसऱ्या भागावर जोरात आदळल्याचं दिसतं

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली 16 जून : सावधगिरी बाळगली नाही की अपघात होतात, अशी म्हण आहे. ही गोष्ट या बातमीत अगदी तंतोतंत बसते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती झुल्यावरून खाली पडतो आणि त्यानंतर त्याच झुल्याच्या दुसऱ्या भागावर जोरात आदळल्याचं दिसतं. अशी ही पहिलीच घटना नाही. तर, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आता समोर आलेला व्हि़डिओ काळजाचा ठोका चुकवणारा आहे. आ ‘भैंस’ मुझे मार! तरुणाने म्हशीला चिथवलं; पुढे जे घडलं ते भयंकर; Shocking Video Viral या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ती व्यक्ती झुल्यावर उभी असताना स्टंटबाजी करत होती. त्याला पाहण्यासाठी अनेक लोकही जमले होते. दरम्यान, गोल फिरताना त्याचा पाय घसरला आणि तो तरुण त्या झुल्याच्या दुसऱ्या बाजूला पडला. तोल गेल्यानंतर तरुणाकडे पुन्हा स्वतःला सावरण्यासाठी वेळच उरला नव्हता. दरम्यान तिथे उभ्या असलेल्या गर्दीतून कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला. झुल्याच्या दुसऱ्या बाजूवर जोरात पडल्यानंतर तो तरुण उडून आणखी लांब पडला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

जाहिरात

असे अनेक स्विंग अपघातांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अनेकदा जत्रांमध्ये अशा घटना घडतात. यापूर्वीही रेवाडी, मोहाली, सोनपूरच्या जत्रेत असे अपघात घडले असून त्यात अनेक जण जखमीही झाले आहेत. मोहालीत स्विंग तुटल्याने 16 जण जखमी झाले होते. सध्या लोक झुल्यातून पडतानाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहात आणि शेअर करत आहेत. झुल्यातून पडल्यानंतर आजूबाजूचे लोक त्या तरुणाला वाचवण्यासाठी धावताना दिसले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात