जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आ 'भैंस' मुझे मार! तरुणाने म्हशीला चिथवलं; पुढे जे घडलं ते भयंकर; Shocking Video Viral

आ 'भैंस' मुझे मार! तरुणाने म्हशीला चिथवलं; पुढे जे घडलं ते भयंकर; Shocking Video Viral

आ 'भैंस' मुझे मार! तरुणाने म्हशीला चिथवलं; पुढे जे घडलं ते भयंकर; Shocking Video Viral

म्हशीशी पंगा घेणं तरुणाला चांगलंच महागात पडलं.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जून : काही प्राणी जितके शांत दिसतात, तितकेच ते रागावल्यावर भयानक होतात. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधित एकापेक्षा एक व्हिडीओ समोर येत राहतात. त्यातील काही हृदयाला स्पर्श करतात, तर काही हसू देतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. एका म्हशीने एका व्यक्तीवर खतरनाक हल्ला केला आहे. आ बैल मुझे मार असं म्हणतात ना, या व्यक्तीने आ भैंस मुझे मार, असं केलं. म्हणजे त्याने चक्क एका म्हशीला चिथवलं. म्हशीला राग देणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. म्हशीने त्याच्यासोबत जे केलं त्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नसेल. म्हशीने त्याला असा धडा शिकवला की आता तिच्याशी पंगा घेण्याची हिंमत तो करणारच नाही. VIDEO - जंगलातील झाडात लपून फोटोग्राफर बनवत होता व्हिडीओ; इतक्यात बिबट्याची नजर पडली अन्… व्हिडिओमध्ये एक म्हैस रागावलेल्या व्यक्तीच्या मागे धावताना दिसत आहे, जे पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत. व्हिडिओमध्ये म्हशीचा राग दिसत आहे. म्हैस त्या माणसाचा पाठलाग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती शांत उभ्या असलेल्या म्हशीजवळ जाते. तिच्या हातात लाल कापड आहे. म्हशी समोर राहून व्यक्ती म्हशीला लाल कापड दाखवते. आणि मग काय म्हैस चवताळते. ती त्या व्यक्तीची पाठ धरते. तिच्यावर खतरनाक हल्ला करते. व्हिडिओ पाहून आपल्यालाही धडकी भरते. इवलासा म्हणून शिकार केली, पण छोटाशा पक्षीही बिबट्यावर पडला भारी; कसं वाचवलं स्वतःला पाहा VIRAL VIDEO हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर धडकी भरतेच पण हसूही आवरत नाही.  व्हिडिओवर बर्‍याच कमेंट येत आहेत.

जाहिरात

तुमची या व्हिडिओ वरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात