नवी दिल्ली 22 मार्च : सोशल मीडियावर तुम्ही सक्रीय असाल तर दररोज निरनिराळ्या प्रकारचे कित्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळत असतील. फेसबुकपासून इन्स्टाग्राम, ट्विटर, यूट्यूब अशा जवळपास सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत आपल्याला नवीन काहीतरी व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात, काही भावुक करणारे तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral on Social Media) होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराणही व्हाल आणि तुम्हाला हसूही येईल. मृतावस्थेतील माकड लगेच जिवंत झालं; सामान्य माणसाने केलेल्या चमत्काराचा VIDEO तुम्ही क्रिकेट खेळलं असेल तर तुम्हाला चांगलंच माहिती असेल की कॅच कसा पकडला जातो. मात्र सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने कॅच पकडण्यासाठी जी पद्धत अवलंबली ती अतिशय मजेशीर होती. अनेकदा एखादी वस्तू खाली पडण्यापासून वाचवण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करतो. मात्र या प्रयत्नात आपण स्वतःच खाली कोसळतो. या व्यक्तीसोबतही काहीसं असंच घडलं.
व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती बॉल फेकतो आणि छतावर उभा असलेला व्यक्ती कॅच घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र बॉल त्याच्या हातांपासून काही अंतर दूरच राहातो. यामुळे बॉल पकडण्यासाठी हा व्यक्ती पुढे उडी घेतो आणि थेट छतावरुनच खाली कोसळतो (Man Fell from Building). व्हिडिओ पाहून जाणवतं की इतक्यात वरून कोसळूनही त्याला जास्त मार लागलेला नाही. कारण खाली कोसळताच तो लगेचच उठतो आणि पळू लागतो. Viral Video मध्ये जॉबनंतर 10KM धावणारा कोण आहे प्रदीप? देशसेवेचं आहे स्वप्न सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा मजेशीर व्हिडिओ @ViralPosts5 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. अवघ्या 14 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 15 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी लाईक केला आहे. लोक या व्हिडिओवर निरनिराळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर आहे, जो पाहून तुम्हीही खळखळून हसाल.