मराठी बातम्या /बातम्या /Viral /

पायऱ्यांवर करत होता बाईक स्टंट; तोल जाताच घडली मोठी दुर्घटना, Shocking Video

पायऱ्यांवर करत होता बाईक स्टंट; तोल जाताच घडली मोठी दुर्घटना, Shocking Video

Stunt Video: व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती आपली बाईक पायऱ्यांवरुन खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नात तो यशस्वी होत नाही.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 22 मार्च : सोशल मीडियावर आपल्याला अनेक निरनिराळे व्हिडिओ व्हायरल (Viral Videos on Social Media) झाल्याचं आपल्याला सतत पाहायला मिळतं. यातील मजेशीर व्हिडिओंना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. यातील काही व्हिडिओ इतके खास असतात की अपलोड होताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. सध्या अशाच एक बाईक रायडरचा मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Bike Riding) होत आहे. यात दिसतं की बायकरला स्टंट करणं किती महागात पडलं.

चेंडू पकडण्यासाठी उडी घेतली अन् छतावरुन थेट खाली कोसळला व्यक्ती; VIDEO

स्टंट करण्याची क्रेज आजकाल तरुणांमध्ये भरपूर वाढल्याचं पाहायला मिळतं. रातोरात प्रसिद्ध मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. अनेकदा यासाठी ते स्वतःचा जीवही धोक्यात टाकतात. सध्या व्हायरल होणारा स्टंट व्हिडिओही (Viral Stunt Video) असाच आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की एक व्यक्ती आपली बाईक पायऱ्यांवरुन खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र या प्रयत्नात तो यशस्वी होत नाही. काही पायऱ्या उतरल्यानंतरच त्याचं आपल्या बाईकवरील नियंत्रण सुटतं आणि यानंतर तो घसरतच पायऱ्यांवरुन खाली जाऊन खड्ड्यात कोसळतो.

हा व्हिडिओ रेडिटवर adblr नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. काही तासांमध्ये लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर हजारो लोकांनी लाईकही केला आहे. लोक हा मजेशीर व्हिडिओ इतरांसोबतही शेअर करताना दिसत आहेत.

ग्राहकाच्या दरवाजातच डिलीव्हरी बॉयचं कांड; कॅमेऱ्यात कैद झालं संतापजनक कृत्य

या व्हिडिओवर निरनिराळ्या कमेंटही येत आहेत. अनेकांनी यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलं, कदाचित या व्यक्तीने विचार केला असेल की मी वेळेवर ब्रेक दाबून गाडी थांबवेल. मात्र, त्याला ही संधीच मिळाली नाही. दुसऱ्या एकाने लिहिलं, हा नवीनच गाडी चालवायला शिकलेला व्यक्ती आहे. आणखी एका यूजरने लिहिलं, विना हेलमेट गाडी चालवणं तर तसंही गुन्हा आहे.

First published:

Tags: Funny video, Stunt video