• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • याला म्हणतात LUCK! ऑनलाईन ऑर्डर केले Apple आणि डिलिव्हरीत मिळाला iPhone

याला म्हणतात LUCK! ऑनलाईन ऑर्डर केले Apple आणि डिलिव्हरीत मिळाला iPhone

Apple ऑनलाइन करणाऱ्या या व्यक्तीने पार्सल खोलताच iPhone पाहून (Man ordered apple and get iphone) त्याला धक्काच बसला.

 • Share this:
  ब्रिटन, 15 एप्रिल: ऑनलाईन ऑर्डर (Online order) केल्यानंतर मागवलेली वस्तू ऑनलाइन वेगळी आणि प्रत्यक्षात वेगळी असणं, त्यात काही तरी त्रुटी असणं किंवा मागवली एखादी वस्तू आणि आलं काही भलतंच... हे सर्वकाही नवं नाही. तुम्हीसुद्धा ऑनलाइन शॉपिंग (Online shopping) करत असाल तर तुम्हालाही कधी ना कधी तरी असा अनुभव आलाच असेल. याचा खूप मनस्तापही होतो. पण एका व्यक्तीला मात्र यामुळे गगनात मावेनासा आनंद झाला आहे. त्याने मागवली एक वस्तू आणि त्याला डिलिव्हरी मिळाली दुसरी वस्तू. पण तरी तो आनंदाने नाचू लागला. याचं कारणही तसंच कारण त्याने मागवले होते अॅपल आणि त्याला चक्क अॅपलचा फोन म्हणजे आयफोन जो मिळाला होता (Man ordered apple and get iphone). यूकेतील 50 वर्षांचा निक जेम्स. त्याने ऑनलाईन सफरचंद (Apple) मागवले होते. त्याने दिलेल्या ऑनलाइन ऑर्डरची डिलिव्हरी त्याला मिळाली. त्याने पार्सल खोललं आणि त्याला धक्काच बसला. कारण त्याने ऑर्डर केल्याप्रमाणे त्याला अॅपल तर मिळाले पण सोबतच अॅपलचा आयफोनसुद्धा (iPhone).हे वाचा - VIDEO - ऑफिसमध्येच धू धू धुतलं; आंबटशौकिन बॉसला महिलेने घडवली चांगलीच अद्दल आता तुम्हाला वाटलं असेल की डिलीव्हरी चुकून आली असावी. तसं जेम्सला वाटलं की हा कदाचित प्रँक असावा. कुणीतरी त्याची मस्करी करत असावं, असं त्याने द मिररशी बोलताना सांगितलं. पण तसं काहीच नाही. त्याला खरोखरच सफरचंदांसोबत आयफोन फ्री मिळाला होता. रिपोर्टनुसार निकने टस्को ग्रोसरी शॉपमधून सफरचंद मागवले होते आणि या शॉपच्या प्रमोशन कॅम्पेनचा हा एक भाग होता. टेस्कोमार्फत सुपर सब्स्टिट्युट ऑफर दिली जात आहे. ज्यामध्ये लकी कस्टमरला आयफोन, एअरपॉड्स आणि अशाच इतर महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू फ्री म्हणून दिल्या जात आहेत. विजेत्यांची निवड रँडमली केली जात आहे. ज्यामध्ये निकसुद्धा लकी कस्टमर ठरला. हे वाचा - जगातील सर्वात मोठा ससा चोरीला; शोधून देणाऱ्याला मिळणार तब्बल 1 लाख आता निकसारखे सर्वच ग्राहकांचं असं नशीब असं नाही. याआधी तर चीनमधील एका महिलेने खरंच आयफोन ऑर्डर केला होता आणि त्याऐवजी तिला अॅपल ड्रिंक मिळालं होतं. अशी विचित्र घटना अनेकांसोबत झाली आहे.
  Published by:Priya Lad
  First published: