• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO - एकासाठी दोघांनी लावली आपल्या जीवाची बाजी; समोरून धडधडत 'मृत्यू' आला आणि...

VIDEO - एकासाठी दोघांनी लावली आपल्या जीवाची बाजी; समोरून धडधडत 'मृत्यू' आला आणि...

रेल्वे प्रवाशाच्या बचावाचा थरारक व्हिडीओ

रेल्वे प्रवाशाच्या बचावाचा थरारक व्हिडीओ

रेल्वे ट्रॅकवर बेशुद्ध प्रवाशाला वाचवण्यासाठी दोघांनी आपला जीव धोक्यात घातला.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 20 ऑगस्ट : आपल्यासमोर एखाद्याचा जीव धोक्यात आहे. त्याचा मृत्यू समोरून चालून येत आहे, हे आपल्याला स्पष्ट डोळ्यांनी दिसतं आहे. पण त्यासाठी आपला जीव पणाला लावून समोरच्याला वाचवणारे देवदूत (Save life) दुर्मिळच. सध्या अशाच देवदूतांचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. रेल्वे ट्रॅकवर (Railway track) बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला (Man fainted and fell on railway track)  पोलीस (Police saved life) आणि एका प्रवाशाने (Railway passenger) आपला जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील ही थरारक घटना आहे.
  View this post on Instagram

  A post shared by NYPD (@nypd)

  न्यूयॉर्कमधील मेट्रो स्टेशनवर एका व्यक्ती बेशुद्ध होऊन प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकवर कोसळली. ट्रेन यायला अवघे काही सेकंदच बाकी होते. ही व्यक्ती रेल्वे ट्रॅकवर तशीच पडली होती. या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एक पोलीस अधिकारी धावत आला. त्याने लगेच रेल्वे ट्रॅकवर उडी मारली आणि त्या बेशुद्ध व्यक्तीला तिथून उचलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एक प्रवासीही या पोलिसाच्या मदतीला आला. हे वाचा - 'न्यूयॉर्कमधील डब्बेवाली', आनंद महिंद्रांनी शेअर केला भन्नाट फोटो;कमेंट्सचा पाउस त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलीस आणि प्रवासी या दोघांनीही आपला जीव धोक्यात टाकला होता. कसंबसं करून दोघांनी त्या तरुणाला ट्रॅकवरून उचललं आणि प्लॅटफॉर्मजवळ नेलं. त्यानंतर प्लॅटफॉर्मवरील इतर प्रवाशांनी त्या तरुणाला वर खेचून घेतलं. यानंतर त्याला वाचवणारा पोलीस आणि प्रवासी दोघंही प्लॅटफॉर्मवर चढले आणि काही क्षणातच समोरून ट्रेन आली. हे वाचा - फायर स्टंट बेतला जीवावर! आगीच्या विळख्यात कराटे मास्टरचा मृत्यू; Shocking video न्यूयॉर्क सिटी पोलीस विभागाने  (एनवायपीडी) हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या पोलीस अधिकाऱ्याचं आणि प्रवाशाचं कौतुक होतं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: